CBI Raid On Sameer Wankhede: नवाब मलिकांसह शाहरूख खानला अडचणीत आणणाऱ्या समीर वानखेडेंच्या घरावर सीबीआयचे छापे!

Sameer Wankhede - CBI Raid: भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील दाखल केला गेला आहे.
Sameer Wankhede
Sameer Wankhede Sarkarnama
Published on
Updated on

CBI Raid Mumbai News : सिनेअभिनेते शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान यांना ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर चर्चेत आलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याच घरावर सीबीआयने छापा टाकला. बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. (CBI raids on the house of Sameer Wankhede who put Shah Rukh Khan in trouble with Nawab Malik)

एनसीबीने अहवाल सुपूर्त केल्यानंतर ही सीबीआयने हा कारवाईचा बडगा उचलला आहे . तसेच वानखेडेंवर बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी आता भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील दाखल केला गेला आहे.

Sameer Wankhede
Sanjay Raut Vs Nitesh Rane : राऊत-राणेंची शिवराळ भाषा; महाराष्ट्राची राजकीय संस्कृती का बिघडतेय ?

सीबीआयकडून आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि इतरा काही जणांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील दाखल केला आहे. त्याच्या मुंबईतील घराच्या परिसराची य़ंत्रणेकडून झाडाझडती घेण्यात आली. वानखेडे यापूर्वी एनसीबीचे मुंबई झोनचे प्रमुख अधिकारी होते. सिनेअभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन याला अटक केल्यामुळे ते वादात भोवऱ्यात होते.

क्रूज ड्रग्ज प्रकरणी चर्चेत :

समीर वानखेडे एनसीबीमध्ये अधिकारी असताना, त्यांनी अभिनेते शाहरुख खान यांच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात क्रूज वरून अटक केली होती. यावेळी ते एनसीबीचे प्रमुख अधिकारी होते. न्यायालयातून आर्यन खानला जामीन मिळाला. आणि त्याच्यावरील ड्रग्जचा खटला मागे घेण्यात आला. याप्रकरणातून आर्यनची निर्दोष मुक्तताही करण्यात आली.

Sameer Wankhede
Shinde-Fadnavis Government : सरकार बचावल्यानंतर शिंदे-फडणवीस सुसाट; महत्त्वाच्या निर्णयांचा लावला धडाका !

समीर वानखेडे यांच्यावर गैरमार्गाने सरकारी नोकरी मिळवल्याचे आरोप करण्यात आला होता. समीर वानखेडे यांनी अल्पवयीन असताना बारचा परवाना मिळवल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात होते.

माजी मंत्री नवाब मलिकांनी केले होते आरोप -

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर काही गंभीर आरोप लावले होते. त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे आहे, तसेच आर्यनला केलेली अटक बेकायदेशीर आणि खंडणी मिळवण्यासाठी केला होता, असे आरोप नवाब मलिकांनी लावले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com