Sanjay Raut Vs Nitesh Rane : राऊत-राणेंची शिवराळ भाषा; महाराष्ट्राची राजकीय संस्कृती का बिघडतेय ?

Maharashtra Politics : एकाच पत्रकार परिषदेत राऊतांनी नागडं,नग्न, नंगानाच हे शब्दप्रयोग जवळपास ११ वेळा वापरले.
Sanjay Raut Vs Nitesh Rane
Sanjay Raut Vs Nitesh RaneSarkarnama

Pune : महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. यात राजकीय नेतेमंडळीचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना अर्वाच्च आणि शिवराळ भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

यात मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांच्या अनेक भाषणांमध्ये तसेच 'सामना'च्या अग्रलेखातही सर्रास शिवराळ भाषेचा वापर होत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. शुक्रवारी(दि.१२) तर त्यांनी कहरच केला. पत्रकार परिषदेत नागडं,नग्न, नंगानाच हे शब्दप्रयोग जवळपास राऊतांनी ११ वेळा वापरले.

मागील काही महिन्यांपासून शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपच्या नेतेमंडळींकडून शिवराळ भाषेचा वापरताना कुठलंही तारतम्य बाळगलं जात नाही. यात खासदार संजय राऊत, भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane), शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट, संजय गायकवाड,संतोष बांगर,कृषी मंत्री अब्दुल सत्तार या नेत्यांकडून एकमेकांवर टीका करताना अत्यंत अर्वाच्च भाषा वापरली जात असल्याचं समोर आलं आहे. राजकीय नेतेमंडळीच्या शिवराळ भाषेतील चिखलफेकीमुळे सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळते.

Sanjay Raut Vs Nitesh Rane
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत आरे गेस्ट हाऊसमध्ये काय करत होते? नितेश राणेंच्या सवालाने खळबळ

संजय राऊत यांची ओळख ठाकरे गटाचे फायर ब्रॅंडनेते म्हणून आहे. शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राऊतांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुंगवासाचा कालावधी सोडला तर नित्यनियमानं ते पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरेंची टीकेची धारही अगदी टोकदार होत असल्याचं लपून राहिलेलं नाही.

ठाकरेंविरोधात भूमिका घेणाऱ्यांवर 'सामना'मधून अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात येते. यात केंद्रातील पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, किरीट सोमय्या, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यासह अनेक नेतेमंडळीं आणि चालू राजकीय घडामोडींवर 'सामना'मधून अतिशय अश्लाघ्य भाषेत लक्ष्य करण्यात केलं जातं. यावरुनच सामना, राऊतांवर टीकेची झोडही उठविल्यानंतरही हे कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. भाजप, शिंदे गटाच्या नेतेमंडळींकडूनही राऊतांवर हल्लाबोल करताना आक्षेपार्ह विधानं केली जातात.

Sanjay Raut Vs Nitesh Rane
Harish Salve on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर..; सत्तासंघर्षावर हरीश साळवेंचा मोठा खुलासा!

संजय राऊतांनी दलाल, भिकारचोट, कुत्रा, हरामखोर,चुत्या, चोरमंडळ, नागडं, गद्दार, लफंगे, दगाबाज, विश्वासघातकी यांसारख्या शब्दांचा सर्रास वा पर शिंदे गट आणि भाजपमधील नेतेमंडळींवर जहरी, बोचरी टीका करताना वापरले जातात. या अशा आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेमुळे राऊत हे कायमच आघाडीसह सत्ताधारी पक्षाच्या नेतेमंडळींच्या निशाण्यावर असतात.

काय म्हणाले राऊत?

सर्वोच्च न्यायालयाकडून निकालाचे वाचन झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने काल (११ मे) जल्लोष केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका करताना यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. राज्यपालांची संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आहे. बहुमत चाचणीपासून प्रत्येक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले आहेत. तरीही हे निकालानंतर नागडे का नाचताहेत? सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अंगावर अंतवस्त्रसुद्धा ठेवलं नाही. आमचा व्हीप खरा तर मग हे का नाचत आहेत, पेढे वाटत आहेत अशी आक्षेपार्ह भाषा राऊतांनी टीका करताना वापरली आहे.

Sanjay Raut Vs Nitesh Rane
Bawankule Vs Thackeray : उद्धव ठाकरेंचा त्याच दिवशी पराभव झाला होता : बावनकुळेंचा टोला

शरद पवारां(Sharad Pawar)सह आघाडीच्या नेतेमंडळींकडूनही राऊतांसह संयमानं बोलण्याचा सल्लाही दिला जातो. पण ऐकतील ते राऊत कसले. राजकारणाची खालावलेली पातळी जर नियंत्रणात आणायची असेल तर राऊतांसह सर्वच पक्षाच्या नेतेमंडळीच्या शिवराळ, अर्वाच्च भाषेतील टीकेला कुठंतरी चाप लावणं तितकंच गरजेचं आहे. तसेच एकमेकांवर टीका करणं चुकीचं नाही. पण किमान आक्षेपार्ह, शिवराळ, अर्वाच्च, अश्लील भाषेचा वापर टाळला जावा असं मत समाजमाध्यमांवर व्यक्त केलं जात आहे.

( Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com