Israel - Hamas Ceasefire : ...अखेर 15 महिन्यानंतर इस्त्रायल अन् हमासमध्ये युद्धविराम; ओलिसांची सुटका सुरू!

Israel vs Hamas War Update : इस्त्रायलने 7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या हल्ल्यानंतर हमास विरोधात युद्धाची घोषणा केली होती.
Israel–Hamas war
Israel–Hamas war Sarkarnama
Published on
Updated on

Israel and Hamas war Over : गाझामध्ये हमासच्या तावडीतून मुक्त झालेले तीन ओलीस घर परतल्यानंतर काही तासांतच इस्त्रायलने सोमवारी पहाटेच 90 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले. या ओलीसांना नेणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मोठ्या बस वेस्ट बँकच्या रामल्लाह शहराच्या बरोबर बाहेर इस्त्रायलच्या ओफर तुरुंगातून बाहेर निघाल्या. ज्यानंतर आतिषबाजी सुरू झाली.

पॅलेस्टिनींची गर्दीने घोषणा देत बसकडे धाव घेतली. पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या कैदी प्रकरणातील आयोगाच्या यादीनुसार मुक्त करण्यात आलेले सर्वजण महिला आणि अल्पवयीन होते. अशाप्रकारे जवळपास 15 महिन्यानंतर इस्त्रायल(Israel ) आणि हमास यांच्यात युद्धविराम झाला.

इस्त्रायलने यादीत समाविष्ट सर्वजणांना देशाच्या सुरक्षेशी संबंधित गुन्हे, दगडफेकीपासून हत्येचा प्रयत्न या सारख्या गंभीर आरोपांमध्ये ताब्यात घेतले होते. वेस्ट बँकेवर ताबा मिळवणाऱ्या इस्त्रायली सैन्याने पॅलेस्टिनींना कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक उत्सवाविरोधात वारंवार इशारा दिलेला आहे.

Israel–Hamas war
Donald Trump Net Worth : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे किती संपत्ती, तुम्हाला माहीत आहे का?

मुक्तता मध्यरात्री झाली, ज्यास पॅलेस्टिनींनी वातावरण खराब करणे आणि गर्दीला कैद्यांचे घरी स्वागत करण्याापासून रोखण्याचा प्रयत्न म्हणून टीका केली. मुक्त झालेल्या कैद्यांमध्ये सर्वात आधी 62 वर्षीय खालिदा जर्रार आहेत, जे पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टिन या पीएफएलपीचे प्रमुख सदस्य आहेत. हा धर्मनिरपेक्ष डाव्या विचारसरणीचा गट आहे, जो 1970च्या दशकात इस्त्रायलविरोधात अपहरण आणि अन्य हल्ल्यांमध्ये सहभागी होता.

इस्त्रायल आणि हमास(Hamas)मध्ये गाझा युद्धबंदी कायद्याच्या पहिल्या टप्प्यातील हिस्स्याच्या रूपात निर्धारित आदलाबदल करारात, इस्त्रायलने जवळपास दोन हजार कैद्यांना मुक्त करण्याच्या बदल्यात पुढील सहा आठवड्यात हमासद्वारे पॅलेस्टिनी क्षेत्रात ठेवण्यात आलेल्या 33 इस्त्रायली ओलिसांना हळूहळू मुक्त करणे समाविष्ट आहे.

Israel–Hamas war
Mamata Banerjee on Sanjay Roy Punishment : संजय रॉयला सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर ममता बॅनर्जी समाधानी नाहीत, म्हणाल्या...

इस्त्रायलने 7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या हल्ल्यानंतर हमास विरोधात युद्धाची घोषणा केली होती. गाझामध्ये(Gaza) इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झालेला आहे. परंतु हमास अद्यापही पूर्ण ताकदीनिशी लढतोय. अशावेळी प्रश्न उपस्थित होतो की, अखेर शत्रूपेक्षा अनेक पटीने शक्तिशाली इस्त्रायली सैन्य हमासला का संपवू शकली नाही?

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com