भारत उपासमारीत नेपाळ अन् पाकच्याही पुढं! यावर मोदी सरकार म्हणतंय...

जागतिक भूक निर्देशांक 2021 अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. यामध्ये भारताची मागील वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे.
Global Hunger Index
Global Hunger IndexFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : जागतिक भूक निर्देशांक 2021 (Global Hunger Index 2021) चा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. यामध्ये भारताची (India) मागील वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे. उपासमारीत भारताची स्थिती दयनीय असल्याचे समोर आले आहे. या अहवालामध्ये 116 देशांच्या यादीत भारत 101 व्या क्रमांकावर असून पाकिस्तान, बांग्लादेश व नेपाळ या शेजारील देशांच्याही मागे भारत गेला आहे. यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर मोदी सरकारने अखेर खुलासा केला आहे.

सरकारने म्हटले आहे की, जागतिक भूक निर्देशांकात भारताचे स्थान घसरणे धक्कादायक आहे. या निर्देशांकाची पद्धती अशास्त्रीय आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेच्या माहिती आधार घेण्यात आला आहे. ही माहिती वास्तवातील नसून, त्यात अनेक चुका आहेत. जागतिक भूक निर्देशांक प्रसिद्ध करणाऱ्या संस्थांनी कोणतीही खातरजमा न केलेली नाही. वस्तुस्थिती न तपासता हा निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

भारत हा 2020 मध्ये 94 व्या स्थानावर होता. जागतिक भूक निर्देशांक (GHI) हे देशातील उपासमारीचे मापन करण्याचे बहुमितीय साधन आहे. दरवर्षी हा अहवाल प्रसिध्द केला जातो. या अहवालानुसार 2019 मध्ये भारत 117 देशांमध्ये 102 व्या क्रमांकावर होता. त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे 2020 मध्ये त्यामध्ये सुधारणा होत भारत 94 व्या स्थानावर पोहचला. पण पुन्हा यंदा त्यामध्ये मोठी घसरण झाली असून भारत 101 व्या क्रमांकावर आला आहे.

Global Hunger Index
ते संग्रहालयातील प्राणी नाहीत! डॉ.मनमोहनसिंगांची कन्या आरोग्यमंत्र्यांवर भडकली

नुकत्याच प्रसिध्द झालेल्या या अहवालानुसार चीन, ब्राझील आणि कुवेतसह 18 देश अव्वल ठरले आहेत. तर भारतातील उपासमारीचा स्तर चिंताजनक असल्याचे अहवालात नमूद केले आहे. भारताला निर्देशांत मिळालेल गुण 2000 मध्ये 38.8 एवढे होते. 2012 आणि 2021 दरम्यान हे गुण 28.8-27.5 च्या मध्ये राहिले आहेत. अल्पपोषण, कुपोषण, मुलांची वाढ आणि बाल मृत्यू या चार निकषांच्या आधारे हे गुण दिले जातात.

Global Hunger Index
येडियुरप्पांची नाराजी दूर करून मुख्यमंत्री बोम्मईंनी त्यांची खुर्ची केली बळकट

यावर्षीच्या अहवालानुसार भारताच्या शेजारील नेपाळ व बांग्लादेश 76 व्या क्रमांकावर आहेत. तर म्यानमार 71 आणि पाकिस्तान 92 व्या स्थानावर आहे. या देशांतील उपासमारीची स्थितीही चिंताजनक असली तरी भारताच्या तुलनेत काहीशी चांगली आहे. नागरिकांना आहार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत या देशांनी भारतापेक्षा आघाडी घेतल्याचे अहवालावरून स्पष्ट होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com