ते संग्रहालयातील प्राणी नाहीत! डॉ.मनमोहनसिंगांची कन्या आरोग्यमंत्र्यांवर भडकली

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले आहे.
Manmohan Singh
Manmohan SinghFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग (Manmohan Singh) यांना भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले आहे. त्यांना भेटण्यासाठी गेलेले केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. कुटुंबीयांचा विरोध असतानाही रूग्णशय्येवरील डॉ.सिंग यांच्यासोबत मंडाविया यांनी फोटो काढल्याने वाद निर्माण झाला आहे.

मंडाविया हे काल (ता.14) डॉ.सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. डॉ.सिंग यांच्या खोलीत ते गेल्यानंतर त्यांच्यासोबत फोटोग्राफरही होता. याला डॉ.सिंग यांच्या निकटवर्तीयांनी विरोध केला होता. असे असतानाही मंडाविया यांनी रुग्णशय्येवरील डॉ.सिंग यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर त्यांनी हे फोटो डिलिट केले होते.

या घटनेवर डॉ.सिंग यांच्या कन्या दमणदीप सिंग (Damandeep Singh) यांनी अखेर मौन सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आरोग्यमंत्र्यांसोबत माझ्या वडिलांच्या खोलीत फोटोग्राफरही गेला होता. त्यावेळी माझ्या आईने याला विरोध केला होता. तरीही तो फोटोग्राफर फोटो घेत राहिला. आधीच माझे आई-वडील कठीण प्रसंगात असताना त्यांना हा धक्का देण्यात आला. ते ज्येष्ठ नागरिक आहेत. ते काही प्राणी संग्रहालयातील प्राणी नाहीत.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी डॉ.मनमोहनसिंग यांची एम्समध्ये भेट घेतली.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी डॉ.मनमोहनसिंग यांची एम्समध्ये भेट घेतली.
Manmohan Singh
माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांच्या प्रकृतीबाबत 'एम्स'चा अखेर खुलासा

डॉ.सिंग यांना ताप आणि अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना 13 ऑक्टोबरला तातडीने एम्समध्ये हलवण्यात आले होते. रुग्णालयातील कार्डिओ-न्युरो सेंटरमधील वॉर्डमध्ये डॉ.सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत. हृदयरोगतज्ञ डॉ.नितीश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, ती सुधारत आहे, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने एम्सच्या हवाल्याने दिली आहे. डॉ.सिंग यांना एम्समध्ये दाखल केल्यानंतर काल (ता.14) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही एम्समध्ये जाऊन डॉ.सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. कुटुंबीयांची विचारपूस करून ते परतले होते.

Manmohan Singh
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अर्जावर सही न केल्यानं पद आलं धोक्यात‍!

डॉ. सिंग यांना याच वर्षी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत ते कोरोनाबाधित झाले होते. त्यांना 19 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते कोरोनाशी यशस्वी झुंज देऊन 29 एप्रिलला रुग्णालयातून बाहेर पडले होते. मागील वर्षी मे महिन्यात डॉ. सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर कार्डिओ थोरॅसिक विभागात उपचार सुरू होते. डॉ. सिंग यांच्यावर 2009 मध्ये ‘एम्स’मध्येच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉ.मनमोहनसिंग हे 89 वर्षांचे आहेत. ते राज्यसभा सदस्य आहेत. ते राजस्थानमधून राज्यसभेवर गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com