Three New Criminal Laws : राजद्रोह नाही... आता देशद्रोहाचा उल्लेख..! जुलैपासून लागू होणार 3 नवीन फौजदारी कायदे

BJP Political News : या तिन्ही कायद्यांची देशभरात अंमलबजावणी झाल्यानंतर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सजा निश्चित करण्याच्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे बदल होणार आहे.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

केंद्र सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून, त्यांची अंमलबजावणी करण्यावरही भर दिला जात आहे. त्याप्रमाणे गेल्या वर्षी केंद्र सरकारने इंग्रजाच्या राजवटीमधील IPC, CrPC आणि पुरावा कायदा हे फौजदारी कायदे बदलण्यात आले आहेत. या तीन कायद्यांऐवजी आता नव्या कायद्यांची 1 जुलै २०२४ पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून त्या संदर्भातील अधिसूचना काढण्यात आली आहे. (Three New Criminal Laws)

केंद्र सरकारने (Central Government) इंग्रजांच्या राजवटीमधील भारतीय दंड संहिता (IPC), भारतीय पुरावा कायदा, आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) हे तीन कायदे रद्द करण्यात आले आहेत. त्याऐवजी आता भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम, हे तीन नवीन कायदे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तिन्ही नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या कायद्यासंदर्भातील अधिसूचनेवर झालेल्या चर्चासत्रात याची माहिती दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah
Sharad Pawar : 'त्यांचं' आयुष्य दुसऱ्याचं घर फोडण्यात गेलं; रायगडावरून तुतारी फुंकताच पवारांवर भाजपचं टीकास्त्र

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑगस्ट 2023 मध्ये हे तीन विधेयके पहिल्यांदा मांडण्यात आलेली होती. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी डिसेंबर 2023 मध्ये या नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीला संमती दिली होती. आता या तिन्ही कायद्यांची देशभरात अंमलबजावणी झाल्यानंतर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सजा निश्चित करण्याच्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे बदल होणार आहे. या नवीन कायद्यांमध्ये काही नवीन कलमांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या बदललेल्या कायद्यांमध्ये पूर्वी वापरण्यात येणाऱ्या राजद्रोह या शब्दाऐवजी आता देशद्रोह असा शब्द वापरला जाणार आहे.

Amit Shah
Manoj Jarange Patil News : "ज्याची संपत्ती 300 कोटी तो 40 लाख कशाला घेईल?" जरांगेंवर बारसकर बरसले!

या कायद्यांच्या अंमलबजावणीनंतर एखाद्या गुन्ह्यातील आरोपी हा विदेशात पळून गेल्यास अथवा यामध्ये विदेशी आरोपींचा प्रत्यक्ष सहभाग असल्यास आता आरोपीच्या अनुपस्थितीमध्ये त्याच्या विरोधात खटला चालवता येणार आहे. तसेच या खटल्यात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय कोणतीही व्यक्ती जर आपल्या भाषणातून, वक्तव्यातून किंवा इतर माध्यमातून जाणीपूर्वक फुटीरतावादाचे विचार पसरवण्याचा अथवा लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याविरोधात आता जन्मठेप किंवा 7 वर्षांच्या सजेची तरतूद करण्यात आली आहे. (Criminal Law)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले, गृहमंत्रालयाच्या स्थायी समितीच्या शिफारशीनंतर जुने कायदे बदलून नवीन कायदे लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सविस्तर विचारांती हे नवीन कायदे बनवण्यात आले आहेत. नवीन भारतीय दंड संहितेनुसार यापुढे आता फुटीरतावादी धोरण, सशस्त्र उठाव, दहशतवादी कारवाया तसेच देशाच्या अखंडतेला बाधा आणणाऱ्या कारवाया अशा प्रकारच्या कारवायांना यापुढे देशद्रोहाच्या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Amit Shah
Arvind Kejriwal ED : शरद पवारांचा अंदाज खरा ठरणार; केजरीवालांना अटकेची शक्यता, काय आहे कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com