भाजपचे पहिल्यांदाच राज्यसभेत खासदारांचे शतक; आता विधेयकं मंजूर करणे सोपे

Rajya Sabha|Congress|BJP| Election: काँग्रेसची राज्यसभेतील सदस्यसंख्या फक्त 33 असून नॉर्थ ईस्टमधून काँग्रेसचा एकही खासदार राज्यसभेत नाही.
PM Narendra Modi & Rajya Sabha
PM Narendra Modi & Rajya SabhaSarkarnama

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (BJP) राज्यसभेत संख्याबळ वाढले असून 1988 नंतर प्रथमच एखाद्या पक्षाला शंभर खासदारांचा (MP) आकडा पार करता आला आहे. राज्यसभेचे (Rajya Sabha) तब्बल 72 सदस्य एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांच्या काळात निवृत्त होणार आहेत. आगामी होणाऱ्या निवडणुकांमुळे राज्यसभेचे संख्याचे समीकरणही बदलणार आहे. कारण पुढच्या तीन महिन्यांत एकाचवेळी राज्यसभेचे 72 सदस्य निवृत्त होत आहेत. काल (ता.31 मार्च) राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या खासदारांची निरोपाची भाषणे झाली व संध्याकाळी राज्यसभेच्या उपसभापतींकडून खास मैफलीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्रातून (Maharashtra) पुन्हा कुठल्या खासदारांना राज्यसभेवर संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

PM Narendra Modi & Rajya Sabha
गुजरात सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका; 'साबरमती' फाईल पुन्हा उघडणार

भाजप खासदारांची राज्यसभेतील संख्या याआधी 97 होती मात्र, नुकत्याच 13 जागासांठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे आणखी 3 खासदार निवडून आल्याने इतिहासात पहिल्यांदाच भाजपने राज्यसभेतील खासदारांच्या संख्येचा तीन अंकी आकडा गाठला आहे. तर, 1988 नंतर पहिल्यांदाच कुठल्या एका पक्षाला राज्यसभेत शंभरचा आकडा पार करता आला आहे. आजघडीला क्रमांक दोनवर असलेल्या काँग्रेसची राज्यसभेतील सदस्यसंख्या फक्त 33 असून नॉर्थ इस्टमधून काँग्रेसचा एकही खासदार राज्यसभेत नाही. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कॅाग्रेसवर ही वेळ ओढवली आहे. त्यात लगेच पुढच्या तीन महिन्यात होणाऱ्या राज्यसभा खासदारांच्या निवडणुकीत भाजपची आजून ताकद वाढत जाणार आहे. त्यामुळे भाजपची अजून संख्या वाढू शकते. येत्या जुलैपर्यंत निवृत्त होणाऱ्या 72 खासदारांमध्ये महाराष्ट्रातल्या सहा खासदारांचाही समावेश आहे. त्यामध्ये शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे पी चिदंबरम, भाजपचे पीयुष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, विकास महात्मे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आदींची टर्म 4 जुलैला संपणार आहे.

PM Narendra Modi & Rajya Sabha
आधी युपीए'त सामील व्हा,मग बोला; चव्हांणांनी राऊतांना झापलं

राज्यातीस या 6 खासदारांपैकी पुन्हा कुणाची राज्यसभेवर वर्णी लागणार आणि कोण निवडून येणार याची उत्सुकता आहे. शिवसेनेचे राऊत आणि राष्ट्रवादीचे पटेलांना पक्षाकडून पुन्हा संधी मिळेल असे चित्र दिसत आहे. तर, पीयुष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांनाही पुन्हा संधी मिळणार हे निश्चित आहे. राज्यात भाजपचे तीन खासदार निवृत्त होत आहेत, मात्र, महाविकास आघाडीची विधानसभेतली ताकद एकत्र राहिली तर भाजपचे दोन खासदार पुन्हा निवडून येऊ शकतात. मात्र, विकास महात्मेंना पुन्हा निवडूण येण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो.

PM Narendra Modi & Rajya Sabha
भाजपचे सहा लाख कार्यकर्ते आले तरी, कोल्हापूरात विजय महाविकास आघाडीचाच...

याचबरोबर राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यातील दोन खासदारांचाही कार्यकाळ संपत आला आहे. त्यामध्ये डॉ. नरेंद्र जाधव यांचा कार्यकाळ 24 एप्रिलला तर संभाजीराजे छत्रपती यांचा कार्यकाळ 3 मे ला संपणार आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या कोट्यातून पुन्हा राज्यातून कुणाला संधी मिळणार किंवा महाराष्ट्रातून संधी दिली जाते का? ही उत्सुकता असणार आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर गुलाम नबी आझाद व आनंद शर्मा यांचाही कार्यकाळ संपत आला आहे. हे दोघेही जी 23 मधले नेते असून गुलाम नबींना अद्याप पुन्हा संधी दिली नाही. तर, शर्मांनाही संधी दिली जाते का हे बघणे महत्वाचे आहे. भाजपच्या राज्यसभेतील वाढत्या ताकदीनंतर त्यांना लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विधेयकं मंजूर करुन घेणे सोपे होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com