कऱ्हाड : तीन लाखांऐवजी भाजपचे सहा लाख कार्यकर्ते आले तरी कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन लाख मतदारांसाठी तीन लाख कार्यकर्ते येतील असे वक्तव्य केले होते. यावर मंत्री सांमत यांनी विजय आमचाच होईल, ही काळ्या दगडावरील रेष आहे, असा विश्वास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
कऱ्हाडच्या शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाला नॅकचे 'ए' प्लस मानांकन मिळाले आहे. त्याबद्दल येथील प्राचार्य के. बी. बुराडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी मंत्री सामंत कराडात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री सामंत यांनी दिल्लीतील जुने महाराष्ट्र सदन काही दिवसात उच्च शिक्षण विभागाच्या ताब्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला तत्वतः मान्यता दिली आहे. दिल्लीला युपीएससीच्या अभ्यासासाठी जाणाऱ्या राज्यातील 100 मुलांच्या राहण्याची मोफत व्यवस्था या सदनात केली जाणार आहे, अशी घोषणा केली.
तसेच महाविकास आघाडीच्या सरकारला डळमळीत करण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नाणार प्रकल्पाबाबत मंत्री सांमत म्हणाले, कोकणात उभारला जाणारा नाणार प्रकल्पावरून वावड्या उटवल्या जात आहेत. तो रिफायनरी प्रकल्प होवू देणार नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. त्या भुमिकेत काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही आवाहन त्यांनी केले.
मंत्री सामंत म्हणाले, राज्यात कोठेही दौरा असला की, त्या जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयाला भेट देतोच. त्यामुळे तेथील स्थिती लक्षात येते. कऱ्हाडचे औषध निर्माण शास्त्र नॅकचा 'ए' प्लस मानांकन मिळवणारे राज्यातील पहिले शासकीय महाविद्यालय आहे. अत्यंत कष्टाने ते मानांकन मिळावले आहे. त्यासाठी या महाविद्यालयास भेट दिली असून येथे इनोव्हेशन हॉल व मुलींच्या वस्तीगृहाला मंजूरी दिली आहे. हॉलसाठी पाच कोटी व वसतीगृहासाठी पाच कोटींचा निधी देत असल्याचे त्यांनी सांगितले.
अद्ययावत ५० मुलींची सोय असलेले वसतीगृह असणार आहे. त्यासह हॉलही चांगल्या दर्जाचा असेल. अन्य शैक्षणिक कार्यक्रमांनाही तो हॉल भाड्याने देण्याचा धोरणात्मक निर्णय येथे घेतला आहे. तो राज्यासाठी लागू केला आहे. त्यातून येणाऱ्या पैशातून हॉलची देखभाल दुरूस्ती होऊ शकते. कऱ्हाडच्या महाविद्यालयातील एम फार्मच्या रिक्त जागाही भरणार आहोत. पीजी अभ्याक्रम समितीलाही लक्ष देण्याच्या सुचना दिल्या आहेत. पीजीच्या मानांकनात येथील विद्यार्थी चमकत आहेत. ही चांगली बाब असून त्याता आता नॅकचे मानांकनही मिळाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.