Chandigarh Mayor Election : सुप्रीम कोर्टाचा भाजपला जोरदार दणका; चंदीगडमध्ये 'आप'चा महापौर बसणारच...

D Y ChandraChud On Chandigarh Mayor Election : "निवडणूक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे..."
Chandigarh Mayor Election
Chandigarh Mayor Election Sarkarnama
Published on
Updated on

Chandigarh News : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांचा चंदीगडच्या महापौरपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मतदान मोजणीवेळी मतपत्रिकांशी छेडछाड केल्याच्या आरोपांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले. न्यायालयाने याबाबत म्हटले की, निवडणूक अधिकाऱ्यांची वृत्ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे. (Latest Marathi News)

Chandigarh Mayor Election
Pune Corporation : निर्ढावलेल्या पुणे पालिकेला मुख्यमंत्र्यांनी फटकारले; आयुक्तांनी तातडीने बोलावली बैठक

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले , "निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांनी गुन्हा केला आहे. यासोबतच न्यायालयाने मसीह यांना अवमानाची नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावत असताना चुकीची माहिती दिली, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे या प्रकरणी अवमानासाठी दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, 'चंदीगडमध्ये आपच्या उमेदवाराचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा केला. अवैध ठरविण्यात आलेल्या मतपत्रिका न्यायालयाने वैध ठरवले आहे. यानुसार अशा परिस्थितीत आता फेरनिवडणूक घेण्याची किंवा मतांची फेरमोजणी करण्याची गरज नाही.

अवैध घोषित केलेल्या मतांचाही समावेश केला, तर आम आदमी पक्षाला एकूण 20 मते मिळतात. त्यामुळे आपचे उमेदवार कुलदीप कुमार विजयी होतात. अशाप्रकारे महापौरपदाच्या निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आणि त्यातून मिळालेली मते जाणूनबुजून बेकायदेशीर ठरवल्याचा आरोप करणाऱ्या आम आदमी पक्षाला आता मोठा विजय मिळाला आहे.

Chandigarh Mayor Election
Narendra Modi : चंदिगड विमानतळाला आता भगत सिंगांचे नाव : पंतप्रधानांची घोषणा!

या प्रकरणात निवडणूक (Election) अधिकारी स्पष्टपणे दोषी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यांनी निवडणुकीत गैरव्यवहार केला होता आणि नंतर न्यायालयातही चुकीची माहिती दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर अवमानाचा खटला चालवावा. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) आदेश येताच आम आदमी पक्षाने हा लोकशाहीचा विजय असल्याचे म्हटले आहे.

'लोकशाहीचा विजय मात्र परिस्थिती चिंताजनक' -

सौरभ भारद्वाज म्हणाले की, या निवडणुकीत देशातील सर्वात तरुण पक्ष जगातील सर्वात मोठ्या पक्षाशी स्पर्धा करत होता. मात्र, ही निवडणूक सर्वोच्च न्यायालयात लढली गेली. या लढाईत देशाच्या लोकशाहीचा मोठा विजय झाला आहे, पण या आनंदापेक्षाही देशाची परिस्थिती काय झाली आहे, याची काळजी वाटते.

स्वातंत्र्य म्हणजे काय? जर लोक स्वतःचे सरकार निवडू शकत नसतील तर कोणते स्वातंत्र्य आणि लोकशाही असू शकते? तीच लोकशाही आज सर्वोच्च न्यायालयाने बहाल केली आहे, असे सौरभ भारद्वाज म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com