Pune Corporation : निर्ढावलेल्या पुणे पालिकेला मुख्यमंत्र्यांनी फटकारले; आयुक्तांनी तातडीने बोलावली बैठक

Maharashtra CMO News : मुख्यमंत्री कार्यालयाने पाठवलेल्या 141 तक्रारींची साधी दखलही पुणे महापालिकेने घेतली नसल्याचे समोर आले आहे.
Pune Corporation-Eknath Shinde
Pune Corporation-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेतील ‘प्रशासक राज’ला पुढील महिन्यात दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीमध्ये प्रशासनाकडून अत्यंत भोंगळ कारभार झाल्याचा आरोप वारंवार लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून करण्यात येत होता. आता अशाच प्रकारचा अनुभव मुख्यमंत्री कार्यालयालाही आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने पाठवलेल्या 141 तक्रारींची साधी दखलही पुणे महापालिकेने घेतली नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री कार्यालयाने फटकारल्यानंतर महापालिकेत आज तातडीची बैठक घेण्यात येणार आहे. (Pune Administrator News)

पुणे महापालिकेकडून (पीएमसी) तक्रारींचे निराकरण करण्यात येणाऱ्या दिरंगाईमुळे कंटाळलेल्या नागरिकांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे धाव घेतली आहे. यातील बहुतांश तक्रारी या रस्त्याशी संबंधित असून, या तक्रारी तातडीने सोडवाव्यात, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने त्या पुन्हा महापालिकेकडे वर्ग केल्या आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून या तक्रारींचे निराकरण होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Citizen complaints Issue)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Corporation-Eknath Shinde
Maharashtra Politics : अशोक चव्हाणांपाठोपाठ काँग्रेसचा आणखी बडा नेता भाजपच्या वाटेवर...?

दिवसेंदिवस या तक्रारीची संख्या वाढत असून, त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने महापालिकेला फटकारले आहे. त्यानंतर प्रशासक तथा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तातडीने याबाबत बैठक घेण्याचा आदेश संबंधित खात्याला दिला आहे. त्यानुसार आज ही बैठक होणार आहे. (Marathi News)

सीएमओने पालिकेच्या नागरी समस्यांवरील 127 तक्रारींची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि 14 विभागीय आयुक्तांकडे पाठवली आहे. जेणेकरून पुणे महापालिका त्याचे लवकरात लवकर निराकरण करेल. एकूण 141 तक्रारींपैकी 49 रस्ते, 25 शहर अभियंता विभाग, 9 घनकचरा व्यवस्थापन विभाग, 9 शिक्षण विभाग, 7 पाणीपुरवठा विभाग आणि प्रत्येकी चार ड्रेनेज, अतिक्रमण किंवा बेकायदा बांधकाम आणि कर विभागाच्या आहेत.

Pune Corporation-Eknath Shinde
Sharad Pawar Kolhapur Tour : पवारांसह बडे नेते आज कोल्हापुरात; ‘डिनर डिप्लोमसी’तून ठरणार महाआघाडीचा उमेदवार

दरम्यान, पीएमसीशी संबंधित तक्रारी आणि अर्ज पोस्टाद्वारे वेळेवर पोहोचत नाहीत; म्हणून तक्रारींचे निराकरण करण्यात वेळ जात आहे,असे कारण महापालिकेने आता पुढे केले आहे. त्यामुळे आता महापालिकेने नागरिकांकडून राज्य सरकारकडे सादर केलेल्या तक्रारी आणि अर्ज गोळा करण्यासाठी मुंबईतील मंत्रालयाला साप्ताहिक भेट देण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Pune Corporation-Eknath Shinde
Politcal News : महाराष्ट्राच्या राजकारणात एकदा नव्हे तर दोनदा भूकंप घडवणारा 'नवा चाणक्य'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com