Chandrababu Naidu : चंद्राबाबूंचा जगनमोहन यांना शपथविधीआधीच पहिला झटका; राजधानीबाबत मोठी घोषणा

Andhra Pradesh Capital Amaravati Jagan Mohan Reddy : जगनमोहन यांनी सत्तेत आल्यानंतर आंध्र प्रदेशाच्या तीन राजधानी करण्याची योजना आखली होती. पण त्यावर नायडू आता पाणी फेरणार आहेत.
Chandrababu Naidu, Jaganmohan Reddy
Chandrababu Naidu, Jaganmohan ReddySarkarnama

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात सत्तांतर होताच शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी शपथविधीआधीच मोठी घोषणा करत मावळते मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या झटका दिला आहे. अमरावतीच आंध्र प्रदेशची राजधानी असेल, अशी घोषणा नायडूंनी मंगळवारी केली.

चंद्राबाबू नायडू हे बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्याआधी मंगळवारी एनडीएच्या बैठकीत नायडू यांची नेतेपती निवड करण्यात आली. त्यानंतर बोलताना नायडू यांनी राजधानीबाबत थेट भाष्य केले. आमच्या सरकारमध्ये तीन राजधान्यांच्या आडून कोणताही खेळ होणार नाही. आपली राजधानी अमरावती आहे आणि अमरावतीच राहील, असे नायडू यांनी जाहीर केले.

विशाखापट्टणम राज्याची आर्थिक राजधानी असेल, असेही नायडूंनी स्पष्ट केले. आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर नायडू हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी अमरावतीला राजधानीचा दर्जा देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी जोरदार तयारीही केली होती. पण 2019 मध्ये जगनमोहन यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी वेगळीच योजना बनवली.

जगनमोहन यांनी तीन राजधान्यांची कल्पना मांडली. त्यानुसार विशाखापट्टणमला प्रशासकीय, अमरावतीला विधीमंडळ आणि कुरनूलला न्यायिक राजधानी बनविण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यावरून काही कायदेशीर अडचणीही समोर आल्या होत्या.

नायडू यांनी राज्यात सत्ता येतात पुन्हा अमरावतीला राजधानी बनविण्यासाठी शंखनाद केला आहे. राज्यात 175 जागांपैकी तेलुगु देशम पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएला तब्बल 164 जागा मिळाल्या आहेत. जगनमोहन यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. चंद्राबाबूंना स्पष्ट बहुमत मिळाले असून केंद्रातही एनडीएची सत्ता आली आहे.

Chandrababu Naidu, Jaganmohan Reddy
Daggubati Purandeshwari : लोकसभा अध्यक्षपदी चंद्राबाबूंची मेहुणी? मोदींची खेळी की दबाव!

राज्याला भरीव आर्थिक मदत मिळवण्यासाठी तसेच अमरावतीला सुसज्ज करण्यासाठी नायडू यांच्याकडून केंद्राकडे आग्रह धरला जाऊ शकतो. तसे स्पष्ट संकेतही त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून दिले जात आहेत. पुढील काही महिन्यांतच आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेज जाहीर होऊ शकते, अशीही चर्चा आहे.     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com