Parliament Budget Session 2023 : मोदी सरकारचे दाबे दणाणले ; अर्थमंत्रालयाची माहिती एकाने परदेशी लोकांना पुरवली...

Parliament Budget Session 2023 : सुकेश असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.
Parliament Budget Session 2023
Parliament Budget Session 2023sarkarnama

Parliament Budget Session 2023 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयात अर्थसंकल्पाची (Parliament Budget Session 2023) तयारी जोरदार सुरु आहे.

मात्र अशातच एक मोठी अपडेट समोर येत आहे. एका व्यक्तीने केंद्र सरकारच्या अर्थ खात्याची महत्त्वाची माहिती परदेशी लोकांना पुरवली असल्याचे उघड झाले आहे, यामुळे प्रशासनाचे ढाबे दणाणले आहे.

एका कंत्राटी कामगाराने मोदी सरकारच्या अर्थ खात्याची महत्त्वाची माहिती परदेशी लोकांना पुरवली असल्याचे तपासात उघड झाले आहे. सुकेश असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या बदल्यात त्याला पैसे दिले जात होते, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

Parliament Budget Session 2023
Kasba Peth Assembly Constituency News : काँग्रेसचं ठरलं ; कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत मोठी घोषणा..

यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात ६६ दिवस चालणार असून यात २७ बैठका होणार आहे. ता. ६ एप्रिल रोजी अधिवेशनांची सांगता होणार आहे.

१४ फेब्रुवारी ते १२ मार्च या दरम्यान अधिवेशन होणार नाही, असे संसद भवनाने स्पष्ट केलं आहे. दोन टप्प्यामध्ये हे अधिवेशन होणार आहे.राष्ट्रपतींचे अभिभाषण, केंद्रीय अर्थसंकल्प आणि अन्य विविध विषयांवर चर्चा होणार आहे. संबंधित संसदीय स्थायी समित्या अनुदानाबाबत कामकाज करुन त्यांचा अहवाल संबधित मंत्र्यालय, विभागाना देण्यासाठी १४ फेब्रुवारी ते १२ मार्च अधिवेशन होणार नाही.

मंत्रालयांत सध्या अस्वस्थता आहे. पक्षाचे मुख्यालय ते पीएमओपर्यंत सुरू असलेल्या बैठका मोदी कॅबिनेटमध्ये मोठ्या बदलाचे संकेत देत आहेत. सूत्रांनुसार, हे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अंतिम फेरबदल असेल. भाजच्या नेमलेल्या मोदी ड्रीम टीम यंदा १० राज्यांत विधानसभा निवडणुका आणि २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत पक्षाची धुरा सांभाळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com