New Delhi : नव्या संसद भवनात आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. कालपासून सुरू झालेले हे अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनानिमित्त संसदेतील कर्मचाऱ्यांना नवे युनिफॉर्म देण्याची चर्चा होती. त्यानुसार आजपासून नव्या संसद भवनातील कर्मचाऱ्यांचे युनिफॉर्म बदलण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांचा नवा पेहराव भारतीय वेशभूषेला साजेसा असा नवा युनिफॉर्म असेल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) संसद भवनातील सुरक्षा कर्मचाऱ्यांचा नवा गणवेश डिझाइन केला आहे. (Changed uniforms of employees in the new parliament building; See the new dress code-as91)
मार्शलसाठी नवीन ड्रेस कोड
नवीन ड्रेस कोडमध्ये दोन्ही संसदेच्या दोन्ही सदनातील मार्शलच्या डोक्यावर मणिपुरी टोप्या असतील, तर टेबल ऑफिस, नोटीस ऑफिस आणि संसदीय अहवाल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी कमळाच्या आकृतिबंध असलेल्या शर्टचा समावेश असेल. महिला अधिकाऱ्यांसाठी नवीन डिझाइन केलेल्या साड्या असतील. (Parliament Session)
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीला नवीन गणवेशाच्या डिझाइनसाठी सूचना देण्यास आल्या होत्या. यानंतर विशेष समितीने त्या सूचनांवरून नवीन गणवेशावर अंतिम निर्णय घेतला. संसद सचिवालय, रिपोर्टिंग, टेबल ऑफिस, नोटीस ऑफिस, विधिमंडळ शाखा आणि सुरक्षा विभागातील सर्व प्रमुख शाखांचे अधिकारी या अधिवेशनात नवीन गणवेश परिधान करतील. यामध्ये मार्शल्सचाही समावेश आहे.
काय बदल होतील?
स्पीकरच्या आसनाजवळ उभ्या असलेल्या मार्शलचा ड्रेस कोड बदलण्यात आला आहे. नवीन ड्रेस कोडनुसार मार्शल आता सफारी सूटऐवजी क्रीम रंगाचा कुर्ता पायजमा घालतील आणि त्यांच्या डोक्यावर मणिपुरी टोपी असेल. याशिवाय पाचही विभागांच्या अधिकाऱ्यांच्या पेहरावात बदल करण्यात येणार आहेत. (National News) सध्या त्यांचा गणवेश हलका निळा सफारी सूट आहे, जो बदलण्यात येणार आहे. त्याऐवजी आम्ही कमळाच्या आकृतिबंधासह स्पोर्ट बटण-डाउन शर्ट असा ड्रेसकोड असेल. यासोबतच क्रीम रंगाचे जॅकेट आणि हलकी पांढरी पँट घालतील.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.