Anil Jaisinghani Bail: अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण; अनिल जयसिंघानीला सशर्त जामीन
Mumbai News : उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या कुप्रसिद्ध बुकी अनिल जयसिंघानीला जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून जयसिंघानीला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सोमवारी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अनिल जयसिंघानीवर आणखी दोन गंभीर गुन्हे असल्याने त्याची तुरुंगातून सुटका होणार नाही. (Latest Political News)
अमृता फडणवीस यांना खंडणीसाठी धमकावणे, ब्लॅकमेल प्रकरणी अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा आणि भावास अटक करण्यात आली होती. जयसिंघानीची मुलगी आणि भावाला यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. आता अनिल जयसिंघानीला सशर्त जामीन दिला आहे. जामीन देण्यापूर्वी न्यायालयाने जयसिंघानीला खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला हजेरी लावणे आणि साक्षीदारांना धमकावू नये, असे निर्देश दिले आहेत. (Maharashtra Political News)
काय आहे प्रकरण ?
अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा फॅशन डिझायनर आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये ती अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना भेटली होती. तिने आईचे निधन झाले असून, सर्व कुटुंबाचा भार उचलत असल्याचे सांगून अनिक्षाने अमृता यांच्याशी मैत्री केली होती.
मैत्रीपूर्ण संबंध असल्याने ती अमृता फडणवीस यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये भेटण्यासाठी वारंवार जात होती. यानंतर अनिक्षाने अमृता यांना २० फेब्रुवारी रोजी ब्लॅकमेल केले होते. यासह लाचेची ऑफरही दिली होती. तसेच फोनवरून धमकावलेही होते. धमकावल्यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती.
कोण आहे अनिल जयसिंघानी ?
अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनुसार मलबार हिल पोलिस ठाण्यात २० फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला होता. त्यानुसार तपास केल्यानंतर या सर्व प्रकारामगे कुप्रसिद्ध क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, यानंतर तो काही दिवस फरारही आहे. त्याला १६ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर अनेक ठिकाणी विविध गुन्ह्यांतर्गत १५ गुन्हे दाखल आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.