काँग्रेसला केजरीवालांचा धसका? चन्नींसाठी घेतला मोठा निर्णय

Punjab Assembly Election : चरणजीतसिंग चन्नींसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय
Charanjitsingh Channi - Arvind Kejriwal
Charanjitsingh Channi - Arvind Kejriwal Sarkarnama
Published on
Updated on

पंजाब : काँग्रेसने आज पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly Election) आपली तिसरी यादी जाहीर केली. यात एकूण ८ जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी (charanjit singh channi) यांच्यासाठीही भदौर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना जाहीर करण्यात आलेली ही दुसरी उमेदवारी आहे. यापूर्वी त्यांना चमकौर साहिबमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे चरणजीतसिंह चन्नी आता दोन मतदारसंघातून लढणार आहेत.

मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी काँग्रेसने हा निर्णय आपण वर्तवलेल्या अंदाजानंतर घेतला असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने चन्नी यांना दोन मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले की, मी म्हटले होते, की सर्वेक्षणानुसार चमकौर साहिबमधून चन्नी निवडणूक जिंकणार नाहीत. आज काँग्रेसने त्यांना दोन जागांवर उमेदवारी घोषित केली आहे. म्हणजे सर्वेक्षण खरे होते? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी २१ जानेवारी रोजी ट्विट करुन म्हटले होते की, मी सकाळीच बोललो होतो, चन्नीजी चमकौर साहिब मधून निवडणूक हारणार आहेत. त्यानंतर आता आज पुन्हा ट्विट करत केजरीवाल यांनी चन्नी यांना दोन मतदार संघातून उमेदवारी जाहीर केल्याच्या निर्णयामागे आपले सर्वेक्षण खरे आहे? असे म्हटले आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Dharmendra Pradhan remains at the centre of political controversy as Opposition parties compare the current situation with instances in which Union ministers resigned during the UPA government, raising questions over political accountability.
CJP Protest_Saurav Das, Ashutosh Ranka_Minister JP Nadda, Jitendra Singh
Delhi Police Commissioner Anurag Kumar
CJP spokesperson Saurabh Das, JP Nadda
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com