Chhattisgarh Accident : मोदींच्या सभेसाठी जाणाऱ्या भाजपच्या बसचा अपघात, दोघांचा मृत्यू

अंबिकापूर जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते बसने रवाना झाले होते
Chhattisgarh Accident
Chhattisgarh Accident Sarkarnama
Published on
Updated on

Chhattisgarh 3 BJP workers dead : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. यात दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बेलतारा येथील महामार्गावर आज (शुक्रवारी) सकाळी हा भीषण अपघात झाला.

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अंबिकापूर जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते बसने रवाना झाले होते. कार्यक्रम ठिकाणी पोहचण्यापूर्वीच रस्त्यात बसची एका ट्रेलरला धडक झाली.

Chhattisgarh Accident
NCP Crisis : शिवाजी महाराजांच्या एकाही मावळ्याने फितुरी केली नाही… पण आपण…?

या अपघातात दोन जण ठार तर सहा जण झाल्याची माहिती समोर येत आहे. या बसमध्ये सुमारे ४७ कार्यकर्ते होते, अशी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. जखमींनी उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Chhattisgarh Accident
Uddhav Thackeray Group Active: बंड केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात ठाकरे गटाची मोर्चेबांधणी ; युवासेनेचे सदस्य..

पंतप्रधान मोदींच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी हे कार्यक्रर्ते अंबिकापूरहून रायपूरला जात होते. अंबिकापूरहून सुटल्यानंतर बस बेलतरा येथे पोहोचली असताना पहाटे हा अपघात झाला.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या अपघातातील मृत्यू झालेल्यांना दोघा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखांची मदत करण्यात आली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com