Chhattisgarh Election 2023 : जाती आधारित जनगणेपासून मोफत शिक्षणापर्यंत : बघेलांचा 'मॅनिफेस्टो ऑफ ट्रस्ट'

Chhattisgarh Congress Manifesto : काँग्रेसने छत्तीसगडच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस पाडला आहे.
Chhattisgarh Congress Manifesto :
Chhattisgarh Congress Manifesto :Sarkarnama
Published on
Updated on

Chhattisgarh Congress Manifesto : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आज (ता.5) आगामी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पक्ष सत्तेवर आल्यास नागरिकांना अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. 90 सदस्यांच्या छत्तीसगड (Chhattisgarh) विधानसभेसाठी येत्या 7 आणि 17 नोव्हेंबर या दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, 3 डिसेंबरला निकाल जाहीर होईल.

मुख्यमंत्री बघेल यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना माध्यमांशी संवाद साधला. “जातीवर आधारित जनगणना केली जाईल. अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्ग, सामान्य वर्ग आणि अल्पसंख्याक यांची जातीनिहाय जनगणना केली जाईल. यामुळे या वर्गातील मागासलेल्या जातींना केवळ राजकीय लाभ मिळणार नाही, तर सरकार त्यांच्यासाठी विशेष धोरण आखून त्यांना सामाजिक आणि आर्थिक लाभही देईल. जातीवर आधारित जनगणना आवश्यक आहे.” असे आश्वासन मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी छत्तीसगडच्या नागरिकांना दिले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने छत्तीसगडच्या जाहीरनाम्याला 'मॅनिफेस्टो ऑफ ट्रस्ट' असे नाव दिले आहे.

Chhattisgarh Congress Manifesto :
Maratha Reservation : आधी दोन आठवड्यांचा अहवाल द्या, त्यानंतरच मुदतवाढ मागा

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही प्रमुख आश्वासने-

- पूर्वीप्रमाणेच या वेळीही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले असून, 2018 मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर बघेल सरकारने 18.5 लाख शेतकऱ्यांचे 9272 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. या वेळीही काँग्रेसचे सरकार येताच कर्जमाफी केली जाईल.

- गॅस सिलिंडरवर 500 रुपयांचे अनुदान - काँग्रेसचे सरकार आल्यास सर्व उत्पन्न गटातील माता-भगिनींसाठी ‘महतरी न्याय योजना’ लागू करून सिलिंडरमागे 500 रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.

-200 युनिट वीज मोफत – काँग्रेसचे (Congress) सरकार पुन्हा स्थापन होताच 200 युनिटपर्यंत वीज उपलब्ध होणार आहे.

-मुख्यमंत्री आवास योजनेंतर्गत 17.5 लाख गरिबांना घरे दिली जाणार आहेत.

- तरुणांना औद्योगिक व्यवसाय कर्जावर 50 टक्के अनुदान मिळेल.

- बचत गटांचे कर्ज माफ केले जाईल.

-जातीवर आधारित सेवा दिली जाईल.

- सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण मोफत. यामध्ये डिप्लोमा, इंजिनिअरिंग, मेडिकल, आयटीआय या अभ्यासक्रमांचा समावेश असेल.

- भूमिहीनांना वर्षाला 10 हजार रुपये मिळणार - राजीव गांधी भूमिहीन शेतमजूर न्याय योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांना देण्यात येणारी रक्कम प्रतिवर्षी 7 हजार रुपयांवरून 10 हजार रुपये करण्यात येणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Chhattisgarh Congress Manifesto :
Rajasthan Election : भाजप, काँग्रेसने आयारामांना संधी दिल्याने प्रस्थापितांमध्ये नाराजी; अनेक ठिकाणी नातेवाईकच आमने-सामने!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com