Chhattisgarh Election : 'रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है', 'शहेनशहा काकांचा' पुतण्याला डॉयलॉग...

Chhattisgarh Election : 'आमच्या नात्यात आम्ही वडील-मुलारखे आहोत...'
Chhattisgarh Election
Chhattisgarh ElectionSarkarnama
Published on
Updated on

Chhattisgarh Election : छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 20 जागांवर आज मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात कडेकोट बंदोबस्तात नक्षल प्रभावित भागात मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा एक फिल्मी डायलॉग चर्चेत आला आहे. बघेल यांच्या पाटण या मतदारसंघात त्यांचाच पुतण्या विजय बघेल यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या पुतण्याला शहेनशहा या चित्रपटातला डायलॉग मारला आहे. ते हसत म्हणाले, "रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है." (Latest Marathi News)

Chhattisgarh Election
Vikhe Patil on NCP : जनाधार गमावलेल्यांना काय महत्त्व देता, त्यांच्याकडं उरला नाही एकही नेता

माध्यम प्रतिनिधींनी बघेल यांना विचारले की, 'काका-पुतण्यामध्ये कोण जास्त मजबूत उमेदवार आहे? बघेल यांनी यावर उत्तर दिले की, 'आमच्या नात्यात आम्ही वडील-मुलारखे आहोत. भूपेश बघेल यांनी या उत्तरातून आपल्या खासदार पुतण्याला पराभूत करणार आहोत, असा सूचकपणे संदेश देण्याचा प्रयत्न केला.

Chhattisgarh Election
Gram Panchayat Election 2023 Result : सांगलीत भाजपने गुलाल उधळला; पण पालकमंत्र्यांच्या पॅनेलचा धुव्वा

पाटणमध्ये काका-पुतण्यामध्ये चुरस -

मुख्यमंत्री भूपेश बघेल पाटण विधानसभेच्या जागेवर त्यांचा पुतण्या विजय बघेल यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. विजय बघेल हे भाजपचे दुर्गचे खासदार आहेत. काका-पुतण्यामध्ये दीर्घकाळापासून राजकीय स्पर्धा आहे. 2008 आणि 2013 मध्येही दोघे एकमेकांसमोर आले आहेत. 2008 मध्ये विजयने आपल्या काकांचा पराभव केला होता, तर 2013 मध्ये त्याच्या काकांनी पुतण्याचा पराभव केला होता.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com