रायपूर : देशभरात सध्या ऑनलाइन जुगार, सट्टेबाजीचे महादेव अॅप प्रकरण (Mahadev App Case) गाजत आहे. बड्या उद्योगपतींसह अभिनेते, पोलिस यांचाही समावेश असून, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhattisgarh CM Bhupesh Baghel) यांच्यावरही आरोप झाले आहेत. त्यानंतर आता बघेल यांनीच पुढाकार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र पाठवून ऑनलाइन जुगाराबाबत मोठी मागणी केली आहे. ऑनलाइन जुगार, सट्टेबाजी (Online Betting) सुरू असलेल्या प्लॅटफॉर्मवर बंदी आणावी, अशी विनंती बघेल यांनी केली आहे.
छत्तीसगडच्या निवडणुकीआधीच महादेव या ऑनलाइन बेटिंग अॅपच्या प्रकरणाने मुख्यमंत्री बघेल यांची झोप उडवली होती. अॅपच्या प्रवर्तकांनी बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महिनाभरापूर्वी केला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींसह भाजपने बघेल यांच्यावर निशाणा साधला होता. आता निवडणूक निकालाच्या दोन दिवसआधी बघेल यांनी ऑनलाइन बेटिंगबाबत मोदींना साकडे घातले आहे.
९० गुन्हे, ४५० आरोपी अटक
ऑनलाइन बेटिंग, गेमिंगच्या माध्यमातून अवैध जुगार आणि सट्टेबाजीच्या व्यापाराचा देशभरात विस्तार झाला आहे. याचे मालक हे विदेशात राहून हा व्यवसाय चालवत आहेत. छत्तीसगड सरकार आणि राज्यातील पोलिस सुरुवातीपासून अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करत आहे. यासंबंधी मार्च २०२२ पासून ९० गुन्हे दाखल असून, ४५० हून आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे बघेल यांनी पत्रात नमूद केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
छत्तीसगड पोलिसांनी ८० ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म, यूआरएल, लिंक, एपीके बंद करण्यासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. गुगलशी पत्रव्यवहार करून महादेव अॅप प्ले स्टोअरवरून काढण्यात आले आहे. नुकतेच केंद्र सरकारने या अॅपसह २२ अशा अॅपवर बंदी आणली आहे, पण हा व्यवसाय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांक, व्हाॅट्स अॅप, मेल आयडी, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, एपीके फाइल या माध्यमातूनही सुरू आहे. त्यामुळे या सर्व माध्यमांवरील जुगारावरही बंदी आणावी, अशी मागणी बघेल यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.