Chhattisgarh Election Result : सत्ता मिळाली, पण भाजप मुख्यमंत्री बघेल यांना रोखू शकले नाहीत...

Chhattisgarh Election News : विशेष म्हणजे भूपेश बघेल यांनी ज्या विजय बघेल यांचा पराभव केला आहे, ते त्यांचे पुतणे आहेत.
Chhattisgarh Election News
Chhattisgarh Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhattisgarh Election News : छत्तीसगड राज्याची निवडणूक विविध कारणांनी गाजली. सत्ताधारी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली, तर भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि गॅरंटीवर बहुमतासह सत्तेकडे कूच केली. (Chhattisgarh Election) गेल्या विधानसभा निवडणुकीत ७१ जागांसह सत्तेवर असलेल्या काँग्रेसची या निवडणुकीत मात्र दयनीय अवस्था झाल्याचे दिसून आले.

Chhattisgarh Election News
Chhattisgarh Election Result : छत्तीसगडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह उपमुख्यमंत्री, मंत्रीही पराभूत..

काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षांसह उपमुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ गेल्या निवडणुकीपेक्षा निम्म्याने घटले. काँग्रेसचे दिग्गज पराभूत होत असतांना मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये बघेल भाजपचे उमदेवार विजय बघेल यांच्याविरुद्ध पिछाडीवर गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री बघेल या निवडणुकीत पराभूत होतात की काय? अशी चर्चा सुरू होती.

परंतु त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये भूपेश बघेल यांनी (BJP)भाजप उमेदवारावर आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत टिकवत विजय मिळवलाच. प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, मत्री एकापाठोपाठ एक पराभूत होत असताना भूपेश बघेल यांनी विजय मिळवत पक्षाची लाज राखली असेच म्हणावे लागेल. (Chhattisgar) दुर्ग जिल्ह्यातील पाटन विधानसभा मतदारसंघात बघेल यांचा सामना भाजपचे खासदार विजय बघेल यांच्याशी होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सतराव्या फेरीअखेर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 94,847 मते मिळाली, तर भाजपच्या विजय बघेल यांना 75304 मतांवर समाधान मानावे लागले. भूपेश बघेल यांनी 19543 मतांनी विजय मिळवत भाजपला पराभूत केले. विशेष म्हणजे भूपेश बघेल यांनी ज्या विजय बघेल यांचा पराभव केला आहे, ते त्यांचे पुतणे आहेत.

भाजपने काकाच्या विरोधात पुतण्याला उभे करण्याची शक्कल लढवली, पण या `काँटे की टक्कर`मध्ये काका भूपेश बघेल यांचा अनुभव पुतण्यावर भारी ठरल्याचे दिसून आले. भाजपने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याविरोधात रान पेटवले होते. महादेव अॅप भ्रष्टाचार प्रकरणात थेट बघेल यांना लक्ष्य करत भाजपने छत्तीसगडमध्ये काँग्रेसची पुरती कोंडी केली होती. भाजपचा हा प्रयोग राज्यात यशस्वीही ठरला, पण भूपेश बघेल यांना विजयापासून रोखण्यात मात्र भाजपला यश आले नाही.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com