Mukesh Chandrakar Murder: धक्कादायक! डोक्यावर 15 जखमा, लिव्हरचे चार तुकडे, मान मोडलेली..; पत्रकाराची निघृण हत्या, ठेकेदाराला अटक

Chhattisgarh Journalist Murder Case : पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टवरून समोर आले आहे.
Mukesh Chandrakar
Mukesh ChandrakarSarkarnama
Published on
Updated on

Chhattisgarh News: छत्तीसगडमधील बीजापूर येथील पत्रकार मुकेश चंद्राकर यांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांचे डोक्यावर 15 ठिकाणी जखमा आढळून आल्या असून लिव्हरचे चार तुकडे झाले होते. तसेच त्यांची मान तुटलेली होती आणि हृदयालाही जखमा झाल्या होत्या. पोस्टमार्टेम अहवालातून ही माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुकेश यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करणाऱ्या डॉक्टरांनी ही अत्यंत क्रुर हत्या असल्याचे म्हटले आहे. आपल्या 12 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अशी हत्या पाहिल्याचे त्यांनी सांगितले. मुकेश यांची दोघांनी किंवा त्याहून अधिक जणांनी हत्या केली असावी, असा दावाही डॉक्टरांनी केला आहे.

Mukesh Chandrakar
Justin Trudeau : भारतविरोधी अजेंडा चालवणाऱ्या पंतप्रधान ट्रुडो यांचा ‘गेम ओव्हर’; काय घडतंय कॅनडात?

आरोपी ठेकेदाराला अटक

मुकेश चंद्राकर यांच्या हत्येच्या आरोपाखाली ठेकेदार सुरेश चंद्राकर याला अटक करण्यात आली आहे. हत्येच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने त्याला हैद्राबाद येथून आज सकाळी अटक केली. त्याच्या पत्नीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

का करण्यात आली हत्या?

पत्रकार मुकेश यांनी ठेकेदार सुरेश चंद्राकर यांच्या भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. सुरेशने बस्तरमध्ये 120 कोटींची रस्त्याची कामे मिळाली होती. रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता नसल्याचे वृत्त मुकेश यांनी दिले होते. पण त्यानंतर मुकेश हे बेपत्ता झाल्याचे समोर आले. पोलिसांनी तपास केल्यानंतर तीन दिवसांपूर्वी एका सेप्टिक टँकमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. एक जानेवीरापासून ते बेपत्ता होते.

Mukesh Chandrakar
Prashant Kishor Arrested : हायव्होल्टेज ड्रामा ; प्रशांत किशोर यांना अंधारातच पोलिसांनी उचलले; नेमकं काय घडलं

तपासामध्ये मुकेश यांना ठेकेदार चंद्राकराच्या भावाने शेवटचा कॉल केल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांचा फोन बंद होता. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये ठेकेदाराच्या भावाने मुकेश यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. लोखंडी सळईने जबर मारहण केल्याने मुकेश यांचा मृत्यू झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com