Ajay Chandrakar : छत्तीसगडमधील भाजप आमदार आणि पूर्वी मंत्री असलेले अजय चंद्राकर आपल्या अनोख्या अंदाजामुळे पुन्हा एकदा चर्चेत विषय ठरत आहेत. ते कायम आपल्या वैशिष्ट्यपुर्ण वक्तव्यांमुळे चर्चेत राहत असतात. अजय चंद्राकर यांचा आजही वेगळाच अनोखा अंदाज पाहायला मिळाला. एका सभेला त्यांनी चक्क हेल्मेट घालून संबोधित केले. या सभेत आपल्यावर कोणीतरी दगड फेकेल, या भीतीने त्यांनी हेल्मेट घालून भाषण केले.
'काँग्रेस हटाओ, छत्तीसगड बचाओ'अशी घोषणा देत, भाजप दुर्ग या जिल्ह्यात जाहीर सभा घेतली होती. या सभामधून काँग्रेसवर, त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. याच ठिकाणी मंगळवारी दुर्गच्या शहराच्या बस स्थानकाजवाळ भाजपची सभा पार पडली होती. येथेही अजय चंद्राकर हेल्मेट घालून सभेत पोहोचले.
सोमवार संध्याकाळी सुपेला जवळील गाडा चौकात अजय चंद्राकर हे सभा घेत आसताना, अचानक दगडफेक सुरू करण्यात आली होती. दगडफेकीच्या प्रकरणामुळे त्यांनी पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. दगडफेक कोणाकडून व का करणयात आली हे अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र त्यांच्या मंचावर मोठे मोठे दगड पडले होते. यात कोणालाही इजा झाली नाही. या दगडफेकीनंतर प्रशासनाचा निषेध म्हणून आणि अशा प्रकारच्या घटनांपासून वाचण्यासाठी हेल्मेट घातले.
अजय चंद्राकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आमच्यावर दगडफेक झाली, त्याचा मी हेल्मेट घालून प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. पोलिसांचं काम सामान्य लोकांचं रक्षण करणं असतं, पण सध्याच्या पोलिसांची व्हीआयपी ड्युटी लागली, यामुळे सामान्य लोकांकडे पाहायला त्यांना वेळच नाही. पोलिस कुणाचा कुत्र्याचा सांभाळत आहेत, तर कुणा व्हिआयपीच्या लहान मुले, त्यांच्या महिलांचीही ते पहारा देत आहेत. हे काम फक्त पोलिसांचे राहिले आहे, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.