Devendra Fadnavis : "चंद्रकांत दादांवर फडणवीसांनी ठरवून ट्रॅप टाकण्याचा डाव आखला!"

Chandrakant Patil : देवेंद्र फडणवीस कसे कपटनीतीचे राजकारण करीत आहेत,
Devendra fadanvis
Devendra fadanvisSarkarnama

सांगोला : चंद्रकांत दादा पाटलांना ठरवून, योग्य नियोजनाने, त्यांना ट्रॅप टाकण्याचा डाव उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आखला असल्याचा, मोठा गौपेस्फोट शिवसेनेच्या (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला.

सांगोला येथील महाप्रबोधन यात्रेनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या सभेत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस कसे कपटनीतीचे राजकारण करीत आहेत, याबद्दल सडेतोड बोलल्या. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेत्या संजनाताई घाडी, सोलापूरचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, सहसंपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके, तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, युवा सेना सोशल मीडियाचे आयोध्या पोळ, पुनम अभंगराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Devendra fadanvis
Corona News : BS.7 व्हेरिअंटमुळे टेन्शन वाढलं ; चीनहून भारतात परतलेला रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह!

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस यांनी राजू शेट्टी यांना पराभूत करण्यासाठी सदाभाऊ खोत यांना बाजूला केले. सदाभाऊंना फोडल्यानंतर आता सदाभाऊ गोठ्यात धारा काढत बसले आहेत. आमचे भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अधिवेशनात 83 कोटींचा भूखंड दोन कोटींना कसा विकला हा घोटाळा भाजपनेच बाहेर काढला आहे. भाजपच्याच तीन जणांनी हा गेम केला असल्याचेही अंधारे यांनी सांगितले.

"महाराष्ट्रात भाजपच्या पंकजाताई मुंडे, विनोद तावडे, बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांनाही बाजूला करण्याचा डाव आहे. तावडे त्यांच्या तावडीतून सुटून पुढे निघून गेल्याचेही अंधारे यांनी सांगितले. भाजप पक्ष असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना बरोबर घेतले त्यांना पद्धतशीरपणे बाजूला करीत आहेत. मी त्यांच्या या राजकारणाबद्दल बोलू लागले, प्रश्न विचारू लागले, त्यावेळी मला अडकाविण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. परंतु आपली पाटी कोरी असल्याने मी यांच्या जाळ्यात अडकू शकत नाही. कायद्यात राहून बोलले की फायद्यात राहतं, कायदा लिहिणारा आमचा बापच असल्याने मी जाळ्यात अडकू शकत नसल्याचेही अंधारे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com