सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड हे पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यापूर्वीच त्यांनी आपल्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे, काही शंका उपस्थित केल्या आहेत.
देशाच्या न्यायव्यवस्थेत काम करीत असताना मला जे काम करायचे होते ते काम मी केले का? माझ्या कामाची दखल भविष्यात घेतली जाईल का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे. मला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही माझ्या विचारांच्या पलीकडील आहेत. कदाचीत त्यांचे उत्तर कधीही मिळणे शक्य नाही, असे ते म्हणाले.
"मी पुढील महिन्यात सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त होत आहे. माझे पुढील आयुष्य़ कसे असेल, या विचाराने मी चिंतीत आहे. मी स्वत:लाच प्रश्न विचारतो की मला आयुष्यात जे साध्य करायचे होते. ते मी साध्य केले का? इतिहास माझ्या कार्यकाळाला लक्षात ठेवेल का? मी अजून काही सर्वोत्तम काम करु शकतो का? मी केलेले काम पुढील पिढीला उपयोगी पडेल का?" असे चंद्रचूड म्हणाले. भूतान येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
आपला दोन वर्षांचा कार्यकाळ समाधानकारक होता, असे सांगत ते म्हणाले, कुठल्याही परिणामाची परवा न करता मी माझे काम निष्ठने केले. आपले ध्येय आणि क्षमता यावर विश्वास ठेवून काम केले तर कुठल्याही परिणामाला घाबरण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले.
'पारंपरिक मूल्य हे भारत आणि भूतान यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. पारंपरिक मूल्यांना आधुनिकता यांची जोड दिली पाहिजे, असा सल्ला त्यांनी उपस्थित भूतानवासियांना दिला. भूतानच्या पर्यावरण विषयीच्या जनजागृतीबाबत चंद्रचूड यांनी त्यांचे कौतुक केले. न्यायव्यवस्था ही केवळ वाद-विवाद यांच्याबाबत मर्यादीत नसावी, न्यायव्यवस्था ही सामाजिक परिवर्तनाचे साधन झाले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी गणेशोत्सवात सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं होते. त्यावरुन विरोधक मोदींवर तुटून पडले होते. मोदींनी या प्रकारे सरन्यायाधीशांच्या घरी जाणं आणि त्यांच्या खासगी समारंभामध्ये सहभागी होणं या गोष्टींवरुन वादाला तोंड फुटलं होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.