CJI Dhananjay Chandrachud: चक्क सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी माफी मागितली: काय आहे कारण?

भारताचे सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांची गणना अतिशय शिस्तप्रिय न्यायाधीशांमध्ये केली जाते
CJI DY Chandrachud
CJI DY ChandrachudSarkarnama

CJI Dhananjay Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांची गणना अतिशय शिस्तप्रिय न्यायाधीशांमध्ये केली जाते. ते स्वत: अत्यंत वक्तशीर आहेत आणि त्यांना उशीर केलेलेही आवडत नाही. यासाठी त्यांनी स्वतः हून एक आदर्श ठेवला आहे. CJI चंद्रचूड यांना थोडा उशीर झाला असेल तर ते लगेच माफी मागण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती.

'द वीक'मधील एका वृत्तानुसार, एके दिवशी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना कोर्टरूममध्ये पोहोचण्यास 10 मिनिटे उशीर झाला होता.पण न्यायालयात पोहचताच त्यांनी सर्वात आधी सॉरी म्हणत माफी मागितली. CJI म्हणाले, 'माफ करा, मी सहकारी न्यायाधीशांशी काहीतरी चर्चा करत होतो. त्यामुळे मला उशीर झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी इतक्या लहान गोष्टींसाठी माफी मागणे सामान्य बाब नाही.पण न्यायमूर्ती चंद्रचूड अनेकदा सहजपणे माफी मागतात.

CJI DY Chandrachud
Raju Shetty Big Announcement : लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींची मोठी घोषणा ; दोन्ही सरकारला कंटाळलो..

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, न्यायमूर्ती प्रदीप कुमार सिंह यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड (CJI DY चंद्रचूड) यांची आठवण करून देताना सांगतात की,ते अतिशय शिस्तप्रिय आहेत आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन करतात आणि त्यांची इतरांकडूनही तशीच अपेक्षा असते. चंद्रचूड यांचे इतर सहकारी न्यायाधीशही म्हणतात की सत्य सांगण्यासाठी ते कधीही मागेपुढे पाहत नाहीत आणि हसतमुखाने सत्य सांगणे ही त्याची खासियत आहे.

अलीकडेच इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, वेळ वाचवण्यासाठी आम्ही सुट्टीच्या दिवशीही काम करतो.कोर्टाच्या (Court) वेळेत म्हणजे सकाळी 10:30 ते 4:00 या वेळेत आम्ही जे काम करतो ते आमच्या कामाचा एक छोटासा भाग आहे. दुसर्‍या दिवशी ज्या खटल्यांची सुनावणी करायची आहे. ती तयार करण्यासाठीही तेवढाच वेळ लागतो.सर्व खटल्यांचे निर्णय राखीव असतात, जे शनिवारी तयार होतात आणि त्यानंतर रविवारी देखील, सोमवारच्या खटल्यांसाठी तयारी करावी लागते.

गेल्या हिवाळ्याच्या सुट्टीतही आम्ही असेच काम केले. शेकडो प्रकरणे अशी होती, ज्यावर निर्णय द्यावा लागला. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी मी माझ्या न्यायिक लिपिकासह सुटीच्या दिवशीही निकालाचे काम केल्याचं यावेळी न्यायाधीश चंद्रचूड यांनी यावेळी नमुद केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com