Raju Shetty Big Announcement : लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींची मोठी घोषणा ; दोन्ही सरकारला कंटाळलो..

Raju Shetty Swabhimani Shetkari Sanghatana : विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Raju Shetti
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha elections Raju Shetty big announcement : ऊस तोडणी सातशे रुपये करावी, ऊस तोडणी मशीन मालकांसाठी लवाद स्थापन करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी आज आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकरांना स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले.

राजू शेट्टी यांनी मोर्चानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "राज्य आणि केंद्रातील दोन्ही सरकारला कंटाळलो आहे. त्यांच्यावर शेतकऱ्यांचा आणि जनतेचा विश्वास नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे, " लोकसभेच्या सहा जागा लढणार असल्याच राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Raju Shetti
Thackeray Vs Fadnavis : 'फडतूस - काडतूस' वरुन अंधारे फडणवीसांना असं का म्हणाल्या, "..तुमच्या घरात एक बाई .."

ऊस तोडणी कामगारांच्या विविध मागण्याबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी राजू शेट्टी यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांचाही पाठिंबा दिला आहे. या मोर्चात ऊस तोडणी मजूर, ऊस तोडणी मशीन मालक सहभागी झाले होते.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Raju Shetti
Himanta Biswa Sarma News: 'कॉपी पेस्ट सीएम' वरुन मुख्यमंत्र्यांची कबुली ; नेटकऱ्याने हिणवलं, video व्हायरल...

या पार्श्वभूमीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. "आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहेत. भाजपमधून या अगोदरच बाजूला झालो आहोत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई आमची संपलेली नाही," असे राजू शेट्टी यांनी काही दिवसापूर्वी पत्रकारांना सांगितले होते.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Raju Shetti
Sandeep Deshpande Attack News: संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट ; राजकीय व्यक्ती मास्टरमाईंड...

राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला. अशावेळी सरकार आणि विमा कंपन्यांकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. मात्र, तिकडूनही योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

या पार्श्वभूमीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या तिजोरिवर पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून दरोडा टाकला जात असल्याची टीका शेट्टी यांनी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com