Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच, सरेंडर करावंच लागणार!

Arvind Kejriwal Hearing : राउज एवेन्यू कोर्टाच्या न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी म्हटले की, 5 जून रोजी आदेशाची सुनावणी होईल.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

Delhi Excise Policy Case : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याद्वारे दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी त्यांच्या विरोधात दाखल मनी लाँडरिंग प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनाची मागणी करणाऱ्या अर्जावर तत्काळ दिलास देण्यास निकार दिला आणि आपला आदेश राखून ठेवला. याचाच अर्थ उद्या (रविवार) केजरीवाल यांना तिहार तुरुंगात जावे लागणार आहे.

राउज एवेन्यू कोर्टाच्या न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी म्हटले की, 5 जून रोजी आदेशाची सुनावणी होईल. केजरीवालांना(Arvind Kejriwal) उद्या तुरुंगात जायचं आहे. कारण, केजरीवालांना लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाद्वारे त्यांना दिली गेलेली अंतरिम जामिनाची मुदत उद्या संपणार आहे. केजरीवालांची बाजू मांडणारे वरिष्ठ अधिवक्ता एन हरिहरन यांनी आज ट्रायल कोर्टाला विनंती केली की, या दृष्टीने प्रकरणात आधीच निर्णय घेतला जावा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हरिहरन यांनी म्हटले की, हे निष्फळ ठरेल. मला उद्यापर्यंत याची आवश्यकत आहे. नाहीतर मला आत्मसमर्पण करावे लागेल. यावर न्यायाधीशांनी उत्तर दिलं की, तुम्ही अंतरिम जामिनाचा कालावधी वाढवण्याची मागणी नाही करत, त्यांनी पुन्हा म्हटले की आदेश पाच जून रोजीच सुनावला जाईल.

Arvind Kejriwal
Mallikarjun Kharge : मोदी सरकार जाणार; INDIA आघाडीला बहुमत मिळणार; काँग्रेसच्या नेत्यानं आकडाच सांगितला...

केजरीवालांनी ट्रायल कोर्टात दोन वेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. एका याचिकेत नियमित जामिनाची मागणी केली गेली आहे. तर दुसऱ्या याचिकेत प्रकृतीच्या कारणास्तव सात दिवसांच्या अंतरिम जामिनाची मागणी केली गेली आहे. त्यांच्या नियमित जामिनावर सात जून रोजी सुनावणी होणार आहे.

Arvind Kejriwal
INDIA Bloc Meeting : 'आखिर तक डटे रहो!' निकालापूर्वीच इंडिया आघाडी अलर्ट...

अंमलबाजवणी संचनालयाने(ED) शनिवारी त्यांच्या अंतरिम जामिनावर विरोध दर्शवत म्हटले की, ट्रायल कोर्ट केजरीवालांच्या याचिकेवर विचार नाही करू शकत. कारण, ट्रायल कोर्ट अंतरिम जामिनावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशात बदल नाही करू शकत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com