INDIA Bloc Meeting : 'आखिर तक डटे रहो!' निकालापूर्वीच इंडिया आघाडी अलर्ट...

Rahul Gandhi, Sharad Pawar : इंडिया आघाडीच्या या महत्त्वाच्या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती हे बडे नेते उपस्थित नव्हते.
INDIA Bloc Meeting
INDIA Bloc MeetingSarkarnama

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा शनिवारी शेवटचा सतावा टप्पा पार पडण्यापूर्वीच इंडिया आघाडी अलर्ट झाली आहे. लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमिवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक पार पडली. मतदानादिवशी संपूर्ण मतमोजणी होत नाही तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडायचे नाही, असा ठरावच बैठकीत केला आहे. तसेच मतमोजणी दिवशी घ्यावयाच्या काळजीबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

इंडिया आघाडीने पहिल्यापासूनच इव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित केल्या आहे. निवडणूक आयोगाकडे वारंवार आग्रह धरूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. बैठकीत या मुद्द्याकडे लक्ष वेधत EVM मशीन मध्ये गडबड होऊ नये याची काळजी घेण्यात येणार आहे.

निकालाच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्रावर लक्ष ठेवावेत, असा आदेश यावेळी देण्यात आला आहे. ज्या मतदारसंघातील उमेदवार निवडून येणार नाही, त्या जागांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे, असे अनेक निर्णय INDIA आघाडीच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे.

काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आरजेडी नेते तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, सीपीआयएमचे सीताराम येचुरी आणि सीपीआय (एमएल)चे दीपंकर भट्टाचार्य यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा आदी नेतेही उपस्थित होते.

INDIA Bloc Meeting
Shirur Constituency : 'मी गायब झालो नाही आणि होणारही नाही, प्रतीक्षा आहे..' ; आढळरावांनी लगावला कोल्हेंना टोला!

इंडिया आघाडीच्या या महत्त्वाच्या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती या बड्या नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला आहे. बैठकीनंतर खर्गे म्हणाले, मतमोजणीच्या दिवसापर्यंतच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी इंडिया आघाडीतील पक्षांचे नेत्यांची भेट झाली. लढा अजूनही संपलेला नाही आणि सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते अत्यंत सतर्क आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

INDIA Bloc Meeting
Vijay Wadettiwar : जनावरांना हिरवा चारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर वडेट्टीवारांचा निशाणा; 'राज्यात दोन चित्र...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com