Shivsena News : शिवसेनेचा राम म्हणून ओळख असलेल्या माजी जिल्हाप्रमुखांचा अखेर ‘जय महाराष्ट्र’ : भाजपत प्रवेश करणार

तसे पत्र गावडे यांनी दस्तुरखुद्द शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना पाठविले आहे.
Ram Gawde
Ram GawdeSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : तब्बल ३० वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरेही ज्यांना ’शिवसेनेचा राम’ म्हणत होते, तेच शिवसेनेचे (Shivsena) माजी जिल्हाप्रमुख राम गावडे (Ram Gawde) यांनी अखेर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र गावडे यांनी दस्तुरखुद्द शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना पाठविले आहे. गावडे यांच्यासोबत त्यांचे समर्थक, गावोगावचे सरपंच-उपसरपंच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत येत्या ५ तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. (Shiv Sena's former district chief Ram Gawde will join the BJP on April 5)

खेड तालुक्यातील धानेारे येथील शाखाप्रमुखपदापासून राम गावडे यांनी १९९१ पासून आपल्या राजकीय कारर्किदीस सुरुवात केली. पक्ष संघटनेतील बहुतेक सर्वच पदांवर काम करुन २०१४ पासून तब्बल सहा वर्षे जिल्हाप्रमुख असलेले राम सदाशिव गावडे हे येत्या ५ तारखेला भाजपत प्रवेश करीत आहेत. याबाबतची माहिती खुद्द गावडे यांनीच दिली.

Ram Gawde
Pandharpur Market Committee : प्रशांत परिचारकांनी रणशिंंग फुंकले : ‘आम्ही कशालाही कमी नाही; एकास एकलाही आमची तयारी’

शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे राज्याच्या सर्वोच्च स्थानी बसूनही सामान्य शिवसैनिकांसह जिल्ह्यातील विकासासाठी काहीच दिले गेले नाही. सतत अवमानाची वागणूक आणि वारंवार बैठका- चर्चा करुनही अंमलबजावणीच होत नसल्याने खेड-आळंदी विधानसभा मतदार संघ तसेच शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण भाजपत प्रवेश करीत आहोत. ठाकरे गटातील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत असल्याचे पत्र उध्दव ठाकरे यांना ३१ मार्च रोजी पाठविल्याची माहिती गावडे यांनी दिली.

Ram Gawde
Nitin Gadkari News : ‘नितीन गडकरींना एवढी मते द्याकी मोजणारेही पागल झाले पाहिजेत’

दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनीही दुराग्रहाची भूमिका ठेवल्यानेही आपण आपले राजकीय स्थान अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि इतर पक्षांकडून ऑफर असतानाही हिंदुत्वाच्या मुद्यावर कार्यकर्त्यांची भूमिका लक्षात घेऊन भाजपत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असेही गावडे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com