CM Eknath Shinde : 'नीती'आयोगाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचं विधान, म्हणाले '2047 मधील विकसित भारताचं स्वप्न.. '

Eknath Shinde and NITI Aayog Meeting : जाणून घ्या, NITIआयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या प्रमुख मागण्या काय आहेत?
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

NITI Aayog Meeting News : 'विकसित भारत 2047 यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बैठक झाली. 2027मध्ये पाच ट्रिलियन इकॉनॉमीचं जे आपलं उद्दिष्ट आहे, ते साध्य करण्यासाठी 2027 नंतर 2038 आणि 2047 यासाठी राज्यांनी काय काय तयारी केली आहे याचीही माहिती आम्ही दिली.' अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीती आयोगाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी माध्यमांना सांगितले, 'आम्ही अनेक बंद पडलेले विकास प्रकल्प सुरू केले आहेत. नवीन प्रकल्पही आणले आहेत. अटल सेतू, समृद्ध महामार्ग, कोस्टल हायवे, बंद पडलेली मेट्रो आम्ही सुरू केली. कारशेडचं काम पूर्ण होत आलं आहे. हे प्रकल्प करत असताना आम्ही कल्याणकारी योजनाही राबवल्या आहेत, याबाबतही आम्ही बैठकती माहिती दिली.

तसेच, शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्ण योजना, युवकांच्या रोजगारासाठी स्टायपेंडचा विषय हे आपल्या राज्यात आपण घेतलेले विविध निर्णय आहेत. दिव्यांग मंत्रालय सुरू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. याशिवाय ट्रान्सजेंडबाबत निर्णय घेणारं पहिलं राज्य आहे. अशी अनेक काम आपण केलेली आहेत. या सर्व कामांची आपण माहिती दिली आहे.'

CM Eknath Shinde
Video Mamata Banerjee : पंतप्रधानांसमोरच संतप्त होत नीती आयोगाची बैठक सोडली, बाहेर येताच ममता बॅनर्जी सरकारवर तुटून पडल्या

याशिवाय दूध, कापूस, सोयाबीन आणि कांदा याबाबतही बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहीजे अशाप्रकारचे धोरण केंद्राचे असले पाहीजे, शेतकऱ्यांना फायदा होईल असे निर्णय केंद्र सरकारने घ्यावे अशी मागणीही आम्ही केली.

'जो दुष्काळग्रस्त भाग आहे, त्यासाठी जे पाणी वाहून जातं समुद्राला मिळतं त्यासाठी नियोजन झालं पाहीजे. मराठवाडा दुष्काळमुक्त झाला पाहीजे. यासाठी चर्चा झाली. नाशिक-पुणे रखडलेली रेल्वे, चिपळून -कराड रेल्वे, ठाणे मेट्रो आणि रस्त्यांवरही चर्चा झाली. अंतर्गत नदीजोड प्रकल्प, उद्योगांना चालना देण्यासाठी निधी, उद्योजकांना सवलती आदी अनेक मुद्य्यांवर नीती आयोगाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.' अशी माहिती शिंदेंनी दिली.

याशिवाय 'आपला देश हा अकराव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आला आहे. तो 2027 पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर आला पाहीजे. अशाप्रकारचं जे स्वप्न ते सर्व राज्यांना मिळून साकार केलं पाहीजे. जसं आम्ही महाराष्ट्रात 1 ट्रिलियन डॉलरचं एक उद्दिष्ट आम्ही मनात ठेवलं आहे. 2047मधील विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी मिळून कष्ट घेतले पाहीजेत आणि त्या दृष्टीने जर आपल्या राज्यात निर्णय घेतले तर मला वाटतं हे शक्य होईल. आपला देश आर्थिक महासत्ता बनू शकतो.' असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवलं.

CM Eknath Shinde
Mamata Banerjee : नीती आयोग बैठकीत अपमान, नेमकं काय झालं?

NITIआयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या -

* मराठवाडा वॉटरग्रीड कोंकण वाहून जाणारं पाणी वापरासाठी मिळावं , मराठावाडा दुष्काळमुक्त व्हावा यासाठी मदत

* कांदा उत्पादकांच्या विविध मागण्या, सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या मागण्या

* दूधाला हमीभाव मिळावा, भेसळमुक्त दूध ( एमपीडीए लावा) दुग्धविकास विभागाला कायदा करायला सांगितलं

* ठाणे इंटरनल मेट्रो प्रकल्पाला कॅबिनेटची अंतिम मंजूरी मिळावी.

* दहिसर अंधेरीतल्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी - फनेल रडार झोन शिफ्ट करावा.

* मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ५.९ एकर जागेचं स्थलांतर - बीडीडी चाळी पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी

* पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प

* कराड चिपळूण रेल्वे प्रकल्पाला गती द्यावी

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com