Eknath Shinde Kashmir Tour : मुख्यमंत्री शिंदेंचे चक्कं काश्मीरमध्ये स्वागताचे फलक; स्थानिक समर्थकांचा प्रेमाचा वर्षाव....

Ekanath Shinde Kashmir Tour : मुख्यमंत्री तीन दिवस सुट्टीवर...
Eknath Shinde Jammu Kashmir Tour :
Eknath Shinde Jammu Kashmir Tour : Sarkarnama
Published on
Updated on

National News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Kashmir Tour) यांचा तीन दिवसीय जम्मू काश्मीरचा दौरा सुरू आहे. काश्मीर दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंचा हा पहिलाच जम्मू काश्मीरचा दौरा आहे. यामुळे गुवाहाटीच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या काश्मीरवारीची जोरदार चर्चा होत आहे. यातच जम्मू काश्मीरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागताचे फलक लागले आहेत. (Latest Marathi News)

Eknath Shinde Jammu Kashmir Tour :
Odisha Train Accident : 82 मृतदेहांची अजूनही पटली नाही ओळख; DNA रिपोर्टची प्रतीक्षा, तर बेवारस...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काश्मीरमधील दौऱ्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. तसेच या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा देवदर्शनाचा कार्यक्रम नियोजित आहे. मुख्यमंत्री शिंदे हे काश्मीरमधील प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी जाणार अशी माहिती मिळत आहे. वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रत्यावर मुख्यमंत्री शिंदेंचे स्वागत करणारे फलक लागले आहेत. यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या काश्मीर दौऱ्याची एकच चर्चा सुरू झाली आहे.

Eknath Shinde Jammu Kashmir Tour :
Abdul Sattar News : कृषीमंत्र्यांसाठी कथित पथकाची वसुली ? ; सत्तारांच्या स्वीय सहायकाच्या सहभागाने खळबळ..

मुख्यमंत्री तीन दिवसाच्या सुट्टीवर आहेत. या काळात ते जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावरती गेले आहेत. त्यांचा देवर्शनाचा कार्यक्रम या दौऱ्यामध्ये नियोजित होता. त्यानुसार काश्मीरमधील वैष्णोदेवीच्या मंदिरात ते दर्शनासाठी जाणार आहेत. वैष्णोदेवीचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वागताचे फलक मुख्यमंत्र्यांच्या स्थानिक समर्थक कार्यकर्त्यांनी लावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com