Odisha Train Accident : 82 मृतदेहांची अजूनही पटली नाही ओळख; DNA रिपोर्टची प्रतीक्षा, तर बेवारस...

Coromandel Odisha Train Accident : बेवारस मृतांची विल्हेवाट लावली जाणार...
Odisha Train Accident
Odisha Train AccidentSarkarnama
Published on
Updated on

National News : ओडिशातील बालासोर (Odisha Balasor) येथे झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांपैकी 82 मृतदेह असे आहेत ज्यांची ओळख अद्यापही पटलेली नाही. या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांची डीएनए चाचणी (DNA Test) केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार भुवनेश्वर एम्स रूग्णालयाने (Bhuvaneshwar Aims) गेल्या ४८ तासांत एकही मृतदेह ताब्यात दिलेला नाही. बहुतांश मृतदेह कुजलेले आहेत. त्याच्या ओळखीसाठी आता फक्त डीएनए रिपोर्टचा आधार आहे. (Latest Marathi News)

यासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी एम्सच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मृतांच्या ओळख प्रक्रियेवर चर्चा केली. तेव्हा ते म्हणाले होते, "डीएनए मॅचिंग ही वैज्ञानिक ओळखीची एकमेव पद्धत आहे आणि आम्ही त्या दृष्टीने आम्ही सर्व पावले उचलत आहोत."

Odisha Train Accident
Karnataka Govt News : काँग्रेसचा मोठा निर्णय ; RSS चे संस्थापक हेडगेवार यांचे चरित्र अभ्यासक्रमातून हटविणार..

भुवनेश्वर एम्स् रूग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेहांचे डीएनए प्रोफाइलिंग पूर्ण झाले आहे. त्यांनी ५० हून अधिक नातेवाईकांच्या रक्ताचे नमुनेही गोळा केले असून, ते एक-दोन दिवसांत नवी दिल्लीला पाठवले जाणार आहेत.

“बिहार आणि पश्चिम बंगालमधील काही लोक अजूनही बरेच नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी येत आहेत. आम्ही त्यांना छायाचित्रांवरून मृतदेहांची ओळख पटवण्यास सांगितले आहे. आम्ही डीएनए चाचणीसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करत आहोत, ज्यामुळे त्यांच्या ओळखीची पुष्टी होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान डीएनए अहवाल आल्यानंतरच बेवारस मृतदेहांची देखील विल्हेवाट लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे समजते आहे.

Odisha Train Accident
Foreign Visits of Top Leaders: बापरे! पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर कोट्यावधींचा खर्च; आकडा बघुन तुम्हालाही बसेल धक्का...

बिहारमधील मोतिहारी येथे राहणारे सुभाष साहनी हे देखील एम्स रूग्णालयाबाहेर थांबले आहेत. त्यांनी सांगितले की, फोटोंवरून त्याचा भाऊ राजाचा मृतदेह ओळखला होता, पण दुसऱ्या आणखी एका कुटुंबाने त्याच मृतदेहावर दावा केला, त्यामुळे मृतदेह ओळखण्यास संभ्रम निर्माण होत आहे.

एका मृताच्या नातेवाईकाने सांगितले की, "हा माझ्या लहान भावाचा मृतदेह आहे, तो ताब्यात देण्यात यावा. तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी आम्हाला डीएनए अहवालाची प्रतीक्षा करण्यास सांगितले."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com