Chirag Paswan News : चिराग पासवान यांचा पक्ष झारखंड विधानसभा लढवणार ; आघाडी की स्वबळ निर्णय लवकरच!

Jharkhand Assembly Election : धनबाद येथील एका सभेला संबोधित करताना केंद्रीयमंत्री चिराग पासवान यांनी केली घोषणा ; स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास भाजपचं टेन्शन वाढणार!
Chirag Paswan
Chirag PaswanSarkarnama
Published on
Updated on

Lok Jan Shakti Party (Ram Vilas) : झारखंड विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीयमंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी(रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनी रविवारी मोठी घोषणा केली. त्यांनी धनबाद येथील एका सभेला संबोधित करताना म्हटले की, त्यांचा पक्ष झारखंड विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

मात्र चिराग पासवान यांनी हे स्पष्ट केले नाही की, त्यांचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार की आघाडी करणार आहे. त्यांनी सांगितले की, याबाबत अद्याप सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे.

चिराग पासवान(Chirag Paswan) यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, लोक जनशक्ती पार्टी(रामविलास) झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपली महत्त्वपूर्ण भूमिका बघत आहे. मागील काही काळापासून संघटनात्मक दृष्टीकोनातून मजबूत झाली आहे. माझे नेते आणि वडील रामविलास पासवान यांना झारखंडमधून भक्कम जनाधार मिळालेला आहे. रामविलास पासवानजींची कर्मभूमीच झारखंड आहे. अशावेळी मी माझ्या वडिलांचे ते स्वप्न पूर्ण करण्यास निघालो आहे, ज्यामध्ये त्यांनी विकसित झारखंडला आपले उद्दिष्ट बनवले होते.

Chirag Paswan
Jharkhand Assembly Election and BJP : झारखंड निवडणुकीसाठी 'NDA' आघाडीचं ठरलं; भाजप 'या' पक्षांसोबत एकत्र निवडणूक लढवणार!

चिराग पासवान असंही म्हणाले की, आम्ही या विचाराने पुढे जात आहोत की येणाऱ्या झारखंड विधानसभा(Jharkhand Assembly Election) निवडणुकीत पक्ष मजबुतीने आपले प्रदर्शन करेल. निवडणूक आघाडीतून लढवायची की स्वबळावर, याचा निर्णय राज्यातील संघटनेला करायचा आहे. राज्यस्तरावर सध्या चर्चा सुरू आहे. मला वाटतं की नोटीफिकेशन येईपर्यंत ही स्थिती स्पष्ट होईल, की आम्ही आघाडीतून निवडणूक लढवणार की स्वबळावर.

Chirag Paswan
Haryana BJP News : हरियाणात बंडखोरांविरोधात भाजपची कडक भूमिका ; आठ नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी!

चिराग पासवान यांचे विधान यासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे, कारण एख दिवस आधी शनिवारी आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी घोषणा केली होती की, भाजप झारखंडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एनडीचे घटक पक्ष ‘ऑल झारखंड स्टूडंट्स यूनियन' आणि जनता दल-यूनायटेड(जदयू) यांच्यासोबत मिळून निवडणूक लढेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com