Chirag Paswan : चिराग पासवान भाजपशी आघाडी तोडणार? निवडणूक जाहीर होण्याआधी घेणार निर्णय...

NDA BJP Jharkhand Assembly Election : चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) एनडीएतून लोकसभा निवडणूक लढवली होती.
Chirag Paswan
Chirag PaswanSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी पुन्हा एकदा भाजपचे टेन्शन वाढवले आहे. यावेळी निमित्त ठरले आहे झारखंड विधानसभा निवडणूक. लोकसभा निवडणुकीत एनडीएशी हातमिळवणी करून केंद्रात मंत्रिपद मिळवलेले पासवान लोकसभेसाठी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर चिराग यांनी सरकारच्या काही निर्णयांचा उघडपणे विरोध केला आहे. यूपीएससीची लॅटरल भरती प्रक्रिया असो की वक्त बोर्ड कायद्यात सुधारणा, या निर्णयांविषयीची त्यांची नाराजी लपून राहिली नाही.

तसेच आरक्षणाबाबत दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदलाही त्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता झाऱखंड विधानसभा निवडणुकीबाबत त्यांची भूमिका समोर आली आहे.

Chirag Paswan
 Arvind Kejriwal : ...तोपर्यंत केजरीवालांची खुर्ची रिकामी राहणार! मुख्यमंत्री आतिशी यांची पहिल्याच दिवशी मोठी घोषणा

केंद्रात एनडीएसोबत असलेले चिराग पासवान झारखंडमध्ये मात्र एनडीएत राहायचे की नाही, याबाबत ठाम नाहीत. याविषयी बोलताना ते म्हणाले, स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची की आघाडसोबत जायचे याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल.

झारखंडमध्ये भजाप आणि जेडीयू एकत्र आहेत. चिराग यांचा पक्ष आता एनडीएमध्ये आहे. पण झारखंडबाबत त्यांची ही भूमिका बुचकळ्यात टाकणारी आहे. त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. पासवान यांच्या पक्षाचे बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत पाच खासदार निवडून आले आहेत.

Chirag Paswan
Kumari Selja : प्रचारातून गायब, काँग्रेसचे धाबे दणाणले; भाजप प्रवेशाबाबत कुमारी शैलजा यांचे पहिल्यांदाच मोठं विधान

दरम्यान, झारकंडमध्ये पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखली जात असल्याचे चिराग यांनी सांगितले. पुढील काही दिवसांत राज्यात ठिकठिकाणी पक्षाचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढील दिशा निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com