Chittapur Karnataka Election 2023 Priyank Kharge : कर्नाटकाच्या चाव्या कुणाच्या हातात, हे कळण्यासाठी आता तीन-चार तास बाकी आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगानुसार, चित्तपुर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार प्रियांक खर्गे हे आघाडीवर आहेत. आत्तापर्यंत त्यांना ४३ हजार ७२० मत मिळाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार मणिकांता राठौड हे आहेत, त्यांना ३३ हजार २९६ मते मिळाली आहेत.
सुरवातीच्या कलामध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे सुपुत्र प्रियांक खर्गे यांच्या राजकीय भवितव्याचा निकाल लवकरच लागणार आहे.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत (२०१३ आणि २०१८) मध्ये चित्तपुर विधानसभेतून प्रियांक खर्गे हे निवडून आले होते. २०१८ मध्ये ते ६९ हजार ७०० मतांनी निवडून आले होते. याच मतदारसंघातून मल्लिकार्जून खर्गे २००८ मध्ये आमदार झाले होते. २००९ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. यात त्यांचा विजय झाला होता.
सौंदती मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वास वैघ आघाडीवर आहेत. सौंदती मतदारसंघातून भाजपाच्या रत्ना मामणी पिछाडीवर आहेत तर काँग्रेसचे विश्वास वैघ आघाडीवर असल्याचा कल दिसून येत आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर सध्या आघाडीवर आहेत तर भाजपाचे नागेश मन्नोळकर पिछाडीवर आहेत.
कर्नाटकात कोणाचे सरकार स्थापन होणार, हे ट्रेंडवरून स्पष्ट झालेले नाही. एक्झिट पोलबद्दल बोलायचे झाले तर 10 पैकी 5 जणांनी त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता वर्तवली आहे. चारमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष घोषित करण्यात आला असून एकामध्ये भाजपला आघाडी मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.