
CJI Bhushan Gavai Attack: भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काल भर कोर्टात एका ज्येष्ठ वकिलानं चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा देशभरात सर्वस्तरातून निषेध करण्यात आला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला होता. यानंतर आता खुद्द सरन्यायाधिशांच्या मातोश्री आणि बहिणीनं या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
CJI गवईंच्या बहिण किर्ती गवई म्हणाल्या, "काल सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ला झाला. हा हल्ला निश्चित वैयक्तिक स्वरुपाचा हल्ला नव्हता तर आपल्या संविधानावर केलेला हल्ला आहे. आपलं संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे, त्यामुळं आपलं हे कर्तव्य बनतं की, आपल्याला संविधान सुरक्षित ठेवायचं आहे. तसंच आपल्या देशातील संविधानिक हक्कांचं संरक्षण केलं पाहिजे. हे केवळ आपल्यासाठीच नाही तर भविष्यात जी पिढी तयार होणार आहे, त्यांना आपल्याला एक सुरक्षित भारत द्यायचा आहे. मला केवळ आपल्याला हीच विनंती आणि प्रार्थना करायची आहे की, आपण जो काही आवाज उठवू किंवा प्रत्युत्तर देऊ ते बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक चौकटीतच असावं. वकिलांचं एक व्यक्ती म्हणून होतं ही एक विषारी विचारधारा आहे. याविषारी विचारधारेला आपण थांबवलंच पाहिजे. अशा प्रकारे संविधानाच्याविरोधात जर कोणी वागत असेल तर त्यावर आपण कारवाई केलीच पाहिजे"
त्याचबरोबर सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई यांच्यावर जो चप्पल हल्ला झाला. त्याचा मी सर्वप्रथम निषेध करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसमावेश भारतीय राज्यघटना लिहून जनतेला अर्पण केली आहे. भारतीय संविधान सर्वांना समान संधी देतं पण काही लोक कायदा हातात घेऊन असं वागतात हे भारतासाठी खूपच लाजीरवाणं ठरतं. पण यामुळं देशात अराजकता पसरू शकते त्यामुळं अशी अराजकता निर्माण होईल असं कृत्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मी सर्वांना निवेदन करते की तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही सनदशीर मार्गानं करावं. कायदा हातात घेऊन अराजकता माजवण्याचा कोणालाही अधिकार नाही. कृपया आपले प्रश्न आपण शांततेनं आणि संविधानिक मार्गानं सोडवून घ्यावेत. अशी मी सर्वांना विनंती करते. सर्वांचं मंगल होवो!
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर आज सुप्रीम कोर्टातच सुनावणीवेळी एका माथेफिरु वकिलानं पायतला बूट काढून तो गोंधळ घालत सरन्यायाधिशांपर्यंत पोहोचला आणि तो त्यांच्यावर फेकण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी ही घटना घडली. सोशल मीडियावर अनेकांनी हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं सांगत संबंधित वकिलांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पण भूषण गवई यांनी संबंधित वकिलावर कारवाई संदर्भात कुठलीही सूचना केली नाही. त्यामुळं संबंधित वकिलाला पोलिसांनीही मुक्त केलं आहे. पण यानंतर माध्यमांशी बोलताना या वकिलानं आपल्याला आपल्या या कृत्याचा कुठलाही पश्चाताप नसल्याचंही म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.