CJI BR Gavai : थांबा, नका टाकू! CJI गवईंनी ‘त्या’ वकिलाला अडवलं अन्..! शेवटच्या दिवशी कोर्टात काय घडलं?

CJI BR Gavai farewell : CJI बी.आर. गवई यांच्या निरोप समारंभात गवई यांच्या निरोप समारंभात आज एक प्रसंग घडला. गवईंनी त्याला लगेच अडवलं. जाणून घ्या कोर्टात नेमकं काय घडलं.
CJI BR Gavai
CJI BR GavaiSarkarnama
Published on
Updated on

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सुप्रीम कोर्टातील कामकाजाचा आज शेवटचा दिवस. ते रविवारी निवृत्त होत आहेत. सुप्रीम कोर्टात आज निरोप देताना भावी सरन्यायाधीशांसह इतर सहकारी न्यायाधीश व ज्येष्ठ वकिलांनी सीजेआय गवईंचे तोंडभरून कौतुक केले. पण हे कौतुक सुरू असतानाच एका कटू प्रसंगाची आठवण करून देणारी घटनाही यावेळी घडली.

गवई यांच्या निरोप समारंभात आज एक प्रसंग घडला. निरोप समारंभात त्या वकिलाने आपल्या भाषणात गवई यांच्याबद्दल आदर व्यक्त करत त्यांचं कौतुक केले. कार्यक्रम सुरु असताना एका वकिलाने सीजेआय गवई यांना आदर म्हणून फुलांच्या पाकळ्या उधळण्याचा प्रयत्न केला.

त्या वकिलाने फुलांच्या पाकळ्या उधळण्यासाठी एक खास पॅकेट आणलं आहे. हे ऐकल्यावर सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्याने ते पाकीट उघडले आणि पाकळ्या हातात घेतल्या. पण त्याला काही करण्याआधीच गवई यांनी हसत हस्तक्षेप केला आणि म्हणाले, “नको, नको… फेकू नका. त्या कुणा दुसऱ्याला द्या.” त्यांच्या या वाक्यानंतर संपूर्ण सभागृहात हास्याची लहर पसरली.

CJI BR Gavai
Jayant Patil : जयंत पाटलांवर डाव उलटणार? शिंदेंचा शिलेदार आयात उमेदवाराचा 'गेम' करण्याच्या तयारीत

या घटनेमागे कटू प्रसंगाची एक पार्श्वभूमी आहे. काही महिन्यांपूर्वी एका वकिलाने रागाच्या भरात गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आज जेव्हा पुन्हा एका पाकळ्या फेकण्यासाठी वकिलाने पॅकेट हातात घेतले, तेव्हा क्षणभर कोर्टरूममध्ये हशा पिकला. मात्र लगेचच त्याचे खरे कारण समजताच सर्वजण खळखळून हसू लागले.

CJI BR Gavai
सरकारी योजनांसाठी लिंक केलेला मोबाईल नंबर ठरला 'ब्रह्मास्त्र'! बेपत्ता महिला अन् आरोपींचा 'असा' लागला छडा!

आज त्यांचा सर्वोच्च न्यायालयातील शेवटचा कामाचा दिवस होता. 23 नोव्हेंबर रोजी ते न्यायाधीश पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचे नेतृत्व केले असून, त्यांच्या संयमी स्वभावामुळे ते सहकाऱ्यांमध्ये आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते.

CJI BR Gavai
Election Code of Conduct : निवडणुकीचा निकाल लागताच आचारसंहिता आपोआप संपते? काय सांगतो कायदा, वाचा सविस्तर!

भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती होणार आहे. वरिष्ठतेच्या आधारे सीजेआय गवई यांनी त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे देशाचे 53 वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com