गृहमंत्र्यांना अटक होऊ शकते! मुख्यमंत्री केजरीवालांनीच केला गौप्यस्फोट

माझ्यासह मनिष सिसोसिया, भगवंत मान यांच्याकडेही तपास यंत्रणांना पाठवा, असं आव्हानही केजरीवाल यांनी केंद्र सरकारला दिलं आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी रविवारी मोठा गौप्यस्फोट केला. राज्याच्या गृहमंत्र्यांना कधीही अटक केली जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा त्यांना अटक करतील, अशी माहिती आम्हाला मिळाली असल्याचे केजरीवाल यांनी सांगितल्याने खळबळ उडाली आहे.

दिल्ली सरकारमध्ये सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांच्याकडे गृह खातं आहे. तसेच आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, नगर विकास, पाणीपुरवठा, जलसिंचन या खात्याचेही ते मंत्री आहे. केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांवर छापे टाकले जातील. त्यांना केली जाईल. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सत्येंद्र जैन यांना ईडीकडून (ED) अटक केली जाऊ शकते. पण त्याने आम्ही घाबरणार नाही. त्यांना तपास यंत्रणांना पाठवायचे असेल तर खुशाल पाठवावे, असे केजरीवाल म्हणाले. (Election Update)

Arvind Kejriwal
चर्चा तर होणारच! या देशाच्या पंतप्रधानांनी कोरोना नियमांमुळं स्वत:चंच लग्न केलं रद्द...

माझ्यासह मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्यासह 21 आमदारांवर आधीही छापे टाकले आहेत. छापे टाकूनही तपास यंत्रणांच्या हाती काहीच लागले नाही. आता पुन्हा तेच करत आहेत. सत्येंद्र जैन यांना अटक होऊ शकते. पण त्याने काय होईल. चार-पाच दिवस तुरूंगात ठेवतील. जामीन मिळल्यानंतर पुन्हा बाहेर येतील. पण आम्ही चन्नी (पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी) यांच्यासारखे घाबरणार नाही, अशी टीकाही केजरीवाल यांनी केली.

केजरीवाल म्हणाले, आम्ही कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. चन्नी यांच्याकडे तर कोट्यवधी रुपये मिळाल्याने लोक गोंधळून गेले आहेत. आम्ही केंद्राला सांगु इच्छितो की, तुम्ही तुमच्या तपास यंत्रणांना पाठवा. आम्ही तयार आहोत. माझ्याकडे, ससोसिया, सत्येंद्र जैन, भवतंत मान सगळ्यांकडे पाठवा. आम्ही त्यांचे स्वागत करू, त्यांचा पाहूणचार करू, असा आव्हानही केजरीवाल यांनी दिलं.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच केजरीवाल यांनी चन्नी यांच्यावर जोरदार टीका केली होती. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, 'चन्नी हे सामान्य व्यक्ती नाहीत. बेईमान आहेत.' अवैध वाळू उपसा प्रकरणात चन्नी यांच्या नातेवाईकाच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकली होती. यावेळी घरात कोट्यवधी रुपये सापडले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी हे ट्विट केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com