चर्चा तर होणारच! या देशाच्या पंतप्रधानांनी कोरोना नियमांमुळं स्वत:चंच लग्न केलं रद्द...

ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे नियम अधिक कडक करण्यात आल्याने पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे.
Jacinda Ardern
Jacinda ArdernSarkarnama

वेलिंग्टन : कोरोनाचा (Covid 19) नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉनचा (Omicron) जगभरातील अनेक देशांना विळखा पडला आहे. भारतासह (India) अमेरिका, युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी बहुतेक देशांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. न्युझीलंड (New Zealand) हा देशही त्याला अपवाद नाही. या नव्या नियमावलीमुळं अनेक बंधने आल्याने येथील पंतप्रधानांनी आपलं लग्नच रद्द करत आदर्श घालून दिला आहे.

न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) यांनी आपल्या कृतीतून जगासाठी संदेश दिल्यानं सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. पंतप्रधान अर्डर्न यांनी देशातील कोरोना नियम (Corona Restrictions) अधिक कडक केले आहेत. त्यामुळे त्यांनी रविवारी आपलं लग्नही रद्द करत असल्याची घोषणा केली. लग्न किंवा अशा समारंभामध्ये लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या शंभऱ लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण त्यानंतरही त्यांनी आपलं नियोजित लग्न पुढे ढकललं आहे.

Jacinda Ardern
नवाब मलिकांचा करिष्मा चालणार? राष्ट्रवादीने सोपवली मोठी जबाबदारी

महामारीचा फटका बसलेल्या हजारो न्युझीलंड वासियांप्रमाणेच मीही एक आहे. त्यामुळे माझं लग्न रद्द करत असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन नियमांची अंमलबजावणी पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत होणार आहे. एका लग्नात उपस्थित राहिलेल्या कुटुंबातील नऊ जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे. हे समोर आल्यानंतर देशातील निर्बंध कडक करण्यात आले.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर बंधने असचाना ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) यांनी केलेली दारू पार्टी त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे. या पार्टीमुळे त्यांच्यावर ब्रिटनच्या (United Kingdom) संसदेत माफी मागण्याची वेळ आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठीही दबाव वाढत आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावरील हा त्यांच्या दबाव स्वपक्षातून देखील आहे.

Jacinda Ardern
काँग्रेसला अजूनही भाजपची भीती; उमेदवारांना थेट मंदिर, चर्चमध्ये नेलं अन्...

ब्रिटीश माध्यमांच्या वृत्तानुसार, पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मित्रांना बोलावून दारू पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पंतप्रधान जॉन्सन यांच्या खासगी सचिवाने पाठवलेला ई-मेलमधून हा प्रकार समोर आला होता. जॉन्सन यांच्या सुमारे १०० मित्र आणि सहकाऱ्यांना हा ई-मेल पाठवण्यात आला होता. या ई-मेलमध्ये तुमची दारू तुम्हीच आणा, असे म्हटले होते. जॉन्सन आणि त्यांची प्रेयसी केरी यांनी ही पार्टी दिली होती. आमंत्रणानंतर तब्बल ४० जण या पार्टीला उपस्थित होते. पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान असलेल्या डाऊनिंग स्ट्रीटवरील गार्डनमध्ये २०२० च्या नाताळमध्ये झाली होती. त्यावेळी ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे डाऊनिंग स्ट्रीटवर सातत्याने होणाऱ्या पार्ट्या चर्चेत आल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com