

Himanta Biswa News : बिहारमध्ये भाजप-जेडीयूच्या एनडीए आघाडीने एकतर्फी विजय मिळवला. या निवडणुकीत महिलांना रोजगारासाठी 10 हजार रोख रुपये देणारी 'महिला रोजगार योजना' गेम चेंजर ठरली. तब्बल दीड कोटी महिलांना दहा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात देण्यात आले. या योजनेमुळेच पुन्हा एनडीची सत्ता आल्याचे विश्लेषक सांगत आहेत. आता 'गेम चेंजर' योजनेची आयडीया नेमकी कोणाची होती याची माहिती समोर आली आहे.
महिलांच्या खात्यात थेट दहा हजार जमा करण्याच्या योजनेमागे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची रणनीती होती. बिस्वा यांनी सांगितले की, बिहार सरकारच्या विनंतीनंतर आसाममधील अधिकाऱ्यांनी पटना येथे जाऊन महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या 'जीविका 10 हजार मॉडल'चे सादरीकरण केले. यातूनच बिहार सरकारने महिला रोजगार ही विस्तृत योजना तयार केली. सरमा यांनी हे देखील सांगितले की, या योजनेमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लखपती दीदी योजनेची प्रेरणा होती.
आसामच्या टीमने पाटणामध्ये सादरीकरण करताना सल्ला दिला होता की, महिलांना व्यवसायासाठी सुरुवातीला 10 हजार रुपये देण्यात यावेत. ही रक्कम परत घेऊ नये. आणि ज्या महिला व्यवसायाचा विस्तार करतील त्यांना दोन लाखांपर्यंत अतिरिक्त निधी देण्यात यावा. कर भरणाऱ्या कुटुंबाला या योजनेतून वगळण्यात यावे, असे देखील आसामच्या टीमने सांगितले होते.
बिहार सरकारने आपल्या सोयीनुसार काही बदल करत महिला रोजगार योजनेच्या नावाने ही योजना अंमलात आणली तसेच महिलांना थेट दहा हजार रुपये दिले.
नितीश कुमार यांच्या जेडीयूमधील नेत्यांचे म्हणणे होते की, महिला रोजगार योजनेसाठी आसाम माॅडेल हे मार्गदर्शक ठरले मात्र याचे पूर्ण श्रेय आसामचे नाही. कारण ही योजना एकत्रित विचाराचा परिणाम आहे. कारण मागील अनेक वर्षांपासून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत आहेत. त्या वेगवेगळ्या माॅडेलच्या अनुभवाच्या आधारे या योजनेला अंतिम रुप देण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.