जयंतरावांची बातच न्यारी! थेट एलॉन मस्कला धाडलं आमंत्रण

एलॉन मस्क हे जगप्रसिध्द टेस्ला या इलेक्ट्रिक कार उत्पादित करणाऱ्या कंपनीचे सर्वेसर्वा आहेत.
Elon Musk, Jayant Patil
Elon Musk, Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : इलेक्ट्रिक कार निर्मितीत आघाडीवर असलेल्या टेस्ला (Tesla) कंपनीचा प्रकल्प उभारण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. त्यात भारतही (India) मागे नाही. या क्षेत्रातील अनेक कंपन्या भारतात येण्यासाठी उत्सुक असतात. टेस्लाकडूनही तसे प्रयत्न केले जात आहेत. पण काही आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे ट्विट कंपनीचा सर्वेसर्वा एलॉन मस्क (Elon Musk) यांनी नुकतंच केलं आहे. त्यानंतर देशातील काही राज्यांनी थेट मस्क यांना आपल्या राज्यात प्रकल्प उभारणीसाठी आमंत्रित केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही ही संधी साधली आहे. त्यांनी ट्विट करत मस्क यांना राज्यात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. एलॉन मस्क यांनी भारतात कंपनीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी आव्हांनाचा सामना करावा लागत असल्याचे ट्विट केले आहे. त्या ट्विटला पाटील यांनी रविवारी सकाळी उत्तर देत महाराष्ट्रात उत्पादन सुरू करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं आहे.

Elon Musk, Jayant Patil
सोनू सूदच्या बहिणीला तिकिट मिळताच काँग्रेस आमदार थेट भाजपमध्ये दाखल

पाटील यांनी म्हटलं आहे की, 'एलॉन मस्क, महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक सर्वात प्रगतीशील राज्य आहे. भारतात कंपनीला सुरू करण्यासाठी महाराष्ट्राकडून सर्व सहकार्य केले जाईल. महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत,' असं पाटील यांनी म्हटलं आहे. इतर राज्यांकडूनही मस्क यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राआधी तेलंगणाचे (Telangana) उद्योग व वाणिज्य मंत्री के. टी. रामाराव यांनीही मस्कला आमंत्रित केलं आहे. 'एलॉन, मी तेलंगणा राज्याचा उद्योग व वाणिज्य मंत्री आहे. आमचे राज्य हे भारतातील उद्योगांसाठीचे एक शाश्वत आणि पसंतीला उतरणारे राज्य आहे. टेस्लाला येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सहकार्य कऱण्यात आम्हाला आनंद होईल, असं रामाराव यांनी स्पष्ट केलं आहे.

एलॉन मस्ककडून मागील दोन-तीन वर्षांपासून भारतात प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याबाबत एका ट्विटला उत्तर देताना मस्क याने भारतात सरकारी पातळीवर आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले आहे. त्यांना भारतात आपली उत्पादने लॉन्च कधी करणार, याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. आयात शुल्कावरून सरकार व कंपनीमध्ये बोलणी सुरू असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com