नितीशकुमार राज्यसभेवर? खुद्द त्यांनीच दिले संकेत

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या वक्तव्याने बुधवारी मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत.
CM Nitish Kumar
CM Nitish Kumarsarkarnama
Published on
Updated on

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या वक्तव्याने बुधवारी मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत. राज्यसभेत (Rajya Sabha) जाण्याबाबत त्यांनीच संकेत दिल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आपल्याला राज्यसभेत जायला आवडेल, असं ते म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) कमी जागा मिळवूनही भाजपच्या (BJP) मदतीने नितीशकुमार मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत.

नितीशकुमार यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. नितीशकुमार हे लोकसभेचे खासदार होते. सध्या ते विधानसभेचे सदस्य असून विधान परिषदेचे सदस्य होते. त्यामुळे आता केवळ राज्यसभेचे सदस्यपद त्यांना मिळालेले नाही. याचपार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी एका टप्प्यावर राज्यसभेचे सदस्य व्हायचे आहे, असं स्पष्ट केलं. पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

CM Nitish Kumar
अखेर शिवसेनेनं गीतेंचा मान राखलाच; आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात दाखवून दिलं...

राज्यसभेचे सदस्य व्हायला आवडेल का, असं नितीशकुमार यांना विचारण्यात आलं होतं. ते म्हणाले, राज्यसभेत जाण्यास मला काहीच हरकत नाही. पण आता माझ्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. मी मागील 16 वर्षांपासून मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मला माहित नाही...,' असं म्हणत नितीशकुमार यांनी अर्धवटच भाष्य केलं. नितीशकुमार हे सलग दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्री झाले आहेत.

CM Nitish Kumar
आदित्य ठाकरेंच्या दोन शब्दांनी आमदार कदमांना मिळालं बळ; परबांना सूचक इशारा?

2020 मध्ये बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाने भाजपसोबत आघाडी केली होती. पण या निवडणुकीत त्यांना भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या. पण निवडणुकीआधी नितीशकुमार यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढे करण्यात आला होता. त्यामुळे भाजपने शब्द पाळत त्यांच्याच गळ्यात मुख्यमत्रिपदाची माळ टाकली. पण मागील काही दिवसांपासून दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये वाद झडत असल्याचे प्रसंग अनेकदा घडले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com