माजी मुख्यमंत्रीच म्हणतात...मंत्री, आमदार, जिल्हाधिकारी सगळेच दारू पितात, तुम्हीही प्या!

मोठ्या लोकांना दारू पिल्यानंतरही अटक केली जात नाही. गरिबांना पोलीस पकडतात, असेही ते म्हणाले.
Alcohol

Alcohol

Sarkarnama
Published on
Updated on

पाटणा : बिहारमधील (Bihar) दारूबंदीचा (Alcohol Ban) मुद्दा मागील काही महिन्यांपासून सतत चर्चेत राहिला आहे. आता बिहारचे माजी मुख्यमंत्री व हम पक्षाचे अध्यक्ष जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी थेट नीतिश कुमार (Nitish Kumar) सरकारला घरचा आहेर देत नागिरकांना अजब सल्ला दिला. जिल्हा अधिक्षक, जिल्हाधिकारी, आमदार, मंत्री हे सगळेच दारू पितात. पण त्यांना अटक केली जात नाही. औषध म्हणून थोडी दारू पिणे चुकीचे नाही, असं वक्तव्य मांझी यांनी केलं आहे.

मांझी यांनी एका कार्यक्रमाती भाषणात नागरिकांनाही दारू पिण्याचा सल्ला दिला आहे. दारूबंदीच्या धोरणावरही त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, बिहारमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांसह मंत्री, आमदार, ठेकेदार, जिल्हाधिकारी, जिल्हा अधिक्षक रात्री दहा वाजल्यानंतर दारूचे सेवन करतात. त्यांना अटक केली जात नाही. पण दारूबंदी कायद्याच्या नावाखाली गरीब, दिलतांना पकडून तुरुंगात टाकले जाते, हे चुकीचे आहे.

<div class="paragraphs"><p>Alcohol</p></div>
उद्धव ठाकरेंनी दिला रामदास कदम यांच्यासह आमदारपुत्राला झटका

अर्धी किंवा एक बाटली दारू पिल्याने तुरूंगात टाकले जात आहे. याला न्याय म्हणता येणार नाही. ठराविक प्रमाणात दारू पिल्याने फायदाच होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञही सांगतात, असेही मांझी म्हणाले. जर कुणी 50 लिटर, 100 लिटरसोबत पकडले जात असले तर त्याला तुरूंगात टाकले पाहिजे.

आमच्या समाजात देवी-देवतांना डुकराचा बळी देण्याआधी दारू पाजली जाते. दिवसभर काम करून थकलेल्या मजूराने जर 50 ते 100 रुपयांची दारू पिली तर पोलीस त्याला पकडतात. पण मोठे लोक पितात तेव्हा त्यांना काही होत नाही, असं मांझी म्हणाले आहेत. लोकांना सल्ला देताना मांझी म्हणाले, तुम्ही लोकांनीही मोठ्या लोकांप्रमाणे आपल्या घरात रात्री दारू प्यावी, कुणालाही कळणार नाही. तुम्ही लोक दारू पिऊन रस्त्यावर फिरता, त्यामुळे पकडला जाता, असे मांझी म्हणाले.

मी लहान असताना माझ्या घरीही दारू तयार केली जात होती. माझी आई आणि वडील दारू बनवत असत. पण मी शिक्षण घेतल्यानंतर हे काम बंद केले. आमच्या सभ्यतेतच दारू आहे, त्याला हटवले जाऊ शकत नाही, असेही मांझी यांनी नमूद केलं. यावेळी व्यासपीठावर बिहारचे मंत्रीही उपस्थित होते. मांझी यांचा नीतिश कुमार सरकारला पाठिंबा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com