Delhi Political News : Rahul Gandhi Arvind Kejariwal
Delhi Political News : Rahul Gandhi Arvind KejariwalSarkarnama

Congress Aap Alliance News : काँग्रेसला दिल्लीतील तीन जागा देऊन 'आप'ने नेमकं काय मिळवलं?

Delhi Political News : आपने दाखवली जागावाटपात उदारता आता राष्ट्रीय विस्तारासाठी सज्ज...
Published on

Congres Aap News : राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या जागांवर आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये अखेर समेट घडले आहे. आम आदमी पार्टी दिल्लीत लोकसभेच्या 4 जागा, तर काँग्रेस 3 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे समजत आहे. या समेटमध्ये काही बाबींवर दोन्ही पक्षांमध्ये सहमती घडल्याचे सांगितले जात आहे. हरियाणा, गोवा आणि गुजरातमधील स्थानिक आणि विधानसभेतील जागांवर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. (Congress Aap Alliance)

Delhi Political News : Rahul Gandhi Arvind Kejariwal
NCP Ajit Pawar : राज्यात 'महाभूकंप' होणार! शरद पवार गटासह काँग्रेस हादरणार?

यामध्ये पंजाबबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही. या राज्यात आम्ही सर्व जागांवर लढू, असे आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे म्हणणे आहे. मात्र, हरियाणा, गोवा आणि गुजरातमध्ये 'आप'चा काँग्रेससोबत 'राजकीय समझोता' झाल्यास तो अरविंद केजरीवाल यांच्या पक्षासाठी फायदेशीर ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हरियाणात आत्तापर्यंत 'आप'ला राजकीय अपेक्षित असं राजकीय स्थान मिळालेलं नाही. स्थानिक निवडणुकांमध्ये काही ठिकाणी 'आप'ला तुरळक यश नक्कीच मिळाले, पण विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकात (लोकसभा) फार यश मिळाले नाही, तर गुजरातमध्ये भाजपनंतर काँग्रेसच मोठा पक्ष ठरला आहे. अशा स्थितीत आम आदमी पक्षाला काँग्रेसच्या पाठिंब्याने काही जागांवर उमेदवार उभे करण्याची संधी मिळाली, तर 'आप'ला राष्ट्रीय स्तरावरील विस्ताराच्या दिशेने मोठे यश नक्कीच मिळेल. आम आदमी पक्षाने मुख्यत: गोव्यात काँग्रेसच्या साथीने राजकीय अस्तित्व शोधण्याची तयारी केली आहे. (Latest Marathi News)

Delhi Political News : Rahul Gandhi Arvind Kejariwal
Kamal Haasan : इंडिया आघाडीत सहभागी होण्यास कमल हसन यांचा नकार; काय आहे कारण..?

चंदीगडबाबतही दोन्ही पक्षांत सहमती झाली आहे. या जागेवरून आम आदमी पक्षाचा उमेदवार उभा राहणार असून, त्याला काँग्रेसचा (Congress) पाठिंबा राहणार आहे. दोन्ही पक्षांतील सहमतीनुसार काँग्रेसला पूर्व दिल्ली, चांदनी चौक आणि उत्तर पूर्व दिल्ली या जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे आम आदमी पक्ष जो आधी काँग्रेसला फक्त एक जागा देण्यावर ठाम होता. मात्र, इतर राज्यांतील समीकरणामुळे आप आता काहीशी मवाळ झाली आहे.

(Latest Political News)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com