अमरावती : राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (wine) उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. यावरुन महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. भाजपच्या या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले. '' विरोधकांनी आरोप आरोप करण्यापूर्वी वाईन आणि दारूतील फरक ओळखावा,'' असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे. याला भाजपचे नेते अनिल बोंडे ( anil bonde) यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
अनिल बोंडे म्हणाले, ''नथुराम गोडसेंनी फक्त ३० जानेवारीला महात्मा गांधींची हत्या केली. पण हे महाविकास आघाडी सरकार रोज महात्मा गांधींची हत्या करत आहे. महात्मा गांधींची शिकवण आहे की दारुबंदी झाली पाहिजे. पण हे सरकार तर किराणा दुकानावर दारु विकायला लावतंय. वाईन म्हणजे दारु नाही, असा युक्तीवाद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहे. तसं असेल तर मग संत्र्याच्या रसाऐवजी वाईन घेऊनच महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे विक्री करावी,''
''ज्या महात्मा गांधींनी सांगितलं की चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी गावात दारूबंदी करा. त्याच महात्मा गांधींचा वारसा सांगणारे महाविकासआघाडी सरकारचे नेते आज किराणा दुकान आणि मॉलमध्ये दारू विकण्याचे आदेश देत आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची एकदाच हत्या केली. मात्र हा विकास आघाडी सरकार रोज हत्या करत आहे," अशा शब्दात बोंडे यांनी महाविकास आघाडी सरकारला सुनावलं.
वाईन विक्रीच्या निर्णयावरुन विरोधक भाजपनं महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे ‘सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार हा निर्णय महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करणारा आहे, असे बोंबलणे म्हणजे स्वतःच्या उरल्यासुरल्या अकलेचे दिवाळे काढण्यासारखे आहे. सरकारने हा निर्णय घेतला तो शेतकरी, फलोत्पादन करणाऱ्या कष्टकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून, राज्यातील दाक्ष बागायतदार, वाईन उद्योगास चालना मिळावी म्हणून. त्यात नाक मुरडावे असे काय आहे?’, असे संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं आहे.
‘सरकारने ‘वाईन’ विक्रीसाठी सुपर मार्केट खुले केले म्हणून महाराष्ट्र ‘मद्यराष्ट्र’ होईल असे बरळणे हे झिंगलेल्या मनोवृत्तीचे लक्षण आहे. महाराष्ट्राच्या संस्कारांचा अपमान आहे. दारू म्हणजे औषध आहे. ”थोडी थोडी पिया करो” असा मंत्र चार दिवसांपूर्वी साध्वी प्रज्ञासिंग यांनीच दिला आहे, त्यावर हे झिंगाडे काय बोलणार आहेत?’ असा खोचक सवाल राऊत यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.