

Karnataka Political News : विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात झालेल्या दीर्घ कायदेशीर लढाईनंतर काँग्रेसच्या गायत्री शांतगौडा यांनी भाजपचे उमेदवार तथा तत्कालीन विधान परिषद उपसभापती एम. के. प्राणेश यांचा नऊ मतांनी पराभव केला.
या निर्णयानंतर विधानसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना गायत्री शांतगौडा म्हणाल्या, ‘सत्याचा नेहमीच विजय होतो, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे.’ सुरुवातीला विधान परिषद निवडणुकीत त्या केवळ सहा मतांनी पराभूत झाल्या होत्या.
ज्यानंतर त्यांनी निकालाला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या फेरमतमोजणीचा निकाल बंद लिफाफ्यात सादर करण्यात आला. ज्यामध्ये त्या नऊ मतांनी विजयी झाल्या. तर भाजप उमेदवाराचा पराभव झाला.
तर स्थानिक स्वराज्य संस्थांतील नामनिर्देशित सदस्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसल्याचा स्पष्ट निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाविरोधात प्राणेश यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. यानंतर गायत्री शांतगौडा यांनी, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद, सर्व नेते व कार्यकर्त्यांचे गायत्री यांनी आभार मानले.
विधान परिषदेचा अद्याप दीड वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असून आता या कार्यवाहीबाबत उच्च न्यायालयाने सभापतींना सूचना केल्या. १२ मते अवैध ठरविली असून उच्च न्यायालयाने काँग्रेस उमेदवार गायत्री शांतगौडा यांचा दावा मान्य केला. यामुळे १२ मते अवैध ठरवली असून ती वगळून फेरमतमोजणी करण्याचे आदेश दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.