Congress Vs BJP : काँग्रेसला मोठा धक्का, भाजपने नगरपंचायतीमधील सत्ता हिसकावली! नगराध्यक्षसह 9 सदस्यांच्या हाती 'कमळ'!

Dhanor Nagar Panchayat : 13 पैकी 9 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता काँग्रेसकडे फक्त चार नगरसवेक उरले आहेत. आणि त्यांनी नगरपंचायतीमधील सत्ता देखील गमावली आहे.
BJP vs Congress (AI Image)
BJP vs Congress (AI Image)Sarkarnama
Published on
Updated on

Congress News : विदर्भामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोर नगरपंचातीच्या काँग्रेस नगराध्यक्षासह तब्बल 9 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपने हा धक्का दिला आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. या विषयी वृत्त 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दिले आहे.

नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 13 जागा जिंकत काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती.आता उपनगराध्यक्ष ललित बरछा यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा पौर्णिमा सयाम यांच्यासह नगरसेवक कालिदास मोहुर्ले, नरेश चिमूरकर ,सुषमा भुरसे, सीमा काटेंगे, यामिना पेंदाम, भूषण उंदीरवाडे, माणिक मडावी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसकडे फक्त चार नगसेवक

13 पैकी 9 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता काँग्रेसकडे फक्त चार नगरसवेक उरले आहेत. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पडलेले हे खिंडार भाजपसाठी फायद्याचे ठरणार असल्याची चर्चा आहे.

BJP vs Congress (AI Image)
Dharmendra Pradhan Resign: धर्मेंद्र प्रधानांची विकेट पडली,राष्ट्रपतींनी स्विकारला राजीनामा; मोदींनी विश्वासू मंत्र्यांकडे सोपवली शिक्षण खात्याची जबाबदारी

फडणवीस दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी दिल्ली दौऱ्यावर गेले. या दौऱ्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू आहेत. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चेसाठी केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना बोलावून घेतले. सहा खासदार एकनाथ शिंदेंसोबत आल्याने त्यांची ताकद वाढले आहे. त्यांनी राज्यात तसेच केंद्रात देखील आणखी एका कॅबिनेट पदाची मागणी केली आहे.

BJP vs Congress (AI Image)
Dharmendra Pradhan News : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेणार? CM फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com