Congress Election Committee : काँग्रेसची राष्ट्रीय निवडणूक समिती जाहीर; राज्यातील 'या' दिग्गज नेत्याला डच्चू

BJP VS Congress : आगामी सर्व निवडणुकांच्या काँग्रेस उमेदवारांची यादी समिती करणार फायनल
Congress Leaders
Congress LeadersSarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News : देशात तीन महिन्यांनंतर होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा आणि त्यानंतर २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, काँग्रेसनेही या निवडणुकांसाठी आपली १६ सदस्यांची निवडणूक समितीची घोषणा केली आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी जाहीर केलेल्या या समितीतून मात्र महाराष्ट्रातील नेते मुकूल वासनिक यांना डच्चू दिला आहे. (Latest Political News)

काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी ४ सप्टेंबर रोजी पक्षाची केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. आगामी पोटनिवडणुकांसह राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या समितीवर मोठी जबाबादारी असणार आहे. या निवडणुकांसाठी निवडलेल्या नावांवर विचार करणे, हे या समितीचा उद्देश असणार आहे. दरम्यान, या समितीत खर्गेंनी समितीमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश केला आहे, तर काही दिग्गजांना डावलण्यात आले आहे.

Congress Leaders
Congress Vs BJP : 'इंडिया'चा प्रभाव कमी करण्यासाठीच जालन्याचा प्रकार घडवला; काँग्रेसचा सरकारवर घणाघात

आगामी निवडणुकांसाठी भाजप (BJP) आणि काँग्रेसच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश विधानसभेसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. कर्नाटकमध्ये झालेली चूक भाजप या राज्यात सुधारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, काँग्रेसनेही निवडणूक समिती जाहीर करून पहिले या निवडणुकांसाठी मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे लोकसभेपूर्वीच देशात विधानसभांची रणधुमाळी रंगणार आहे.

Congress Leaders
Solapur Farmer Protest : सोलापुरातील शेतकरी आक्रमक; अधिकाऱ्यांची आंदोलनाकडे पाठ, पहिल्या दिवशी तोडगा नाही

समितीत 'यांचा' समावेश

निवडणूक समितीच्या प्रमुख सदस्यांमध्ये मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी (Rahul Gandhi), अधीर रंजन चौधरी, के.सी. वेणुगोपाल, अंबिका सोनी आणि मधुसूदन मिस्त्री यांचा सहभाग कायम आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टी. एस. सिंग देव, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद, तेलंगणाचे खासदार उत्तमकुमार रेड्डी, कर्नाटकचे मंत्री के.जे. जॉर्ज, उत्तराखंड काँग्रेसचे माजी प्रमुख प्रीतम सिंग, बिहारचे खासदार मोहम्मद जावेद, राज्यसभा सदस्य अमी याज्ञिक, मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते ओंकार मरकाम आणि माजी खासदार पी.एल. पुनिया यांचा या समितीत नव्याने समावेश केला आहे. तर मुकुल वासनिक, गिरीजा व्यास आणि मोहसिना किडवई यांना पॅनेलमध्ये स्थान मिळाले नाही.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com