अशीही भन्नाट ऑफर : काँग्रेसमध्ये कार्यकर्ते आणा अन् सोनं मिळवा!

जे पदाधिकारी अधिकाधिक सदस्य आणतील त्यांना सोन्याची अंगठी बक्षिस म्हणून दिली जाणार आहे.
Tamilnadu Congress
Tamilnadu Congress Sarkarnama
Published on
Updated on

चेन्नई : तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) द्रमुकसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या (Congress) जिल्हाध्यक्षांनी पक्षाचे सदस्य वाढवण्यासाठी अजब घोषणा केली आहे. जे पदाधिकारी अधिकाधिक सदस्य आणतील त्यांना सोन्याची अंगठी (Gold Ring) बक्षिस म्हणून दिली जाणार आहे. या घोषणेची संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे.

दक्षिण चेन्नई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष एम. ए. मुथ्थालकन (M.A. Muthalakan) यांनी ही रविवारी ही घोषणा केली. राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी पदाधिकाऱ्यांना सोन्याची अंगठी देण्याचं आश्वासन दिलं आहे. पक्षाच्या सदस्यांनी अधिकाधिक लोकांना काँग्रेसकडे वळवण्यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. जे सदस्य जास्तीत जास्त लोकांना पक्षाचं प्राथमिक सदस्य करतील त्यानुसार पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक काढला जाईल.

Tamilnadu Congress
काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्री पक्षाला ठोकणार रामराम

सर्वाधिक लोकांना आणलेल्या सदस्याला आठ ग्रॅमची अंगठी दिली जाईल. तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील सदस्याला अनुक्रमे 4 व 2 ग्रॅमची अंगठी देण्यात येणार आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक लक्षात घेत पक्षानं तमिळनाडूत 'काँग्रेस प्रत्येक रस्त्यावर, काँग्रेस प्रत्येक घरात' ही मोहिम हाती घेतली आहे. राहुल गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला. यावेळी तमिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के. एस. अलागिरी आणि AICC चे सचिव सिरिवेला प्रसाद हेही उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना मुथ्थालकन म्हणाले, पूर्वी काँग्रेसच्या सभांना लोकांना बोलवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत होते. आता लोक एका हाकेवर येतात. त्यासाठी वाहनव्यवस्था किंवा अधिक पैसेही खर्च करावे लागत नाहीत. घरोघरी संपर्क मोहिमेमुळे हे शक्य झालं आहे. लोकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहचवण्यासाठी आम्ही आता स्वतंत्र टीम तयार केली आहे.

Tamilnadu Congress
काँग्रेसला आणखी एक झटका; माजी प्रदेशाध्यक्षांनी दिला AICC चा राजीनामा

प्रत्येक रस्त्यावर काँग्रेसचा एकतरी सदस्य हवा, असा निश्चय आम्ही केला आहे. पक्षाच्या कार्यक्रमांना सदस्य झालेल्यांपैकी 50 टक्के लोक आले तरी पुरेसे आहे. पक्षाच्या कार्यक्रमांना आणण्यासाठी त्यांना पैसे किंवा इतर व्यवस्था करणार नाही. प्रत्येक विभागात मोठ्या प्रमाणावर सदस्यता नोंदणी मोहिमेचे नियोजन करण्यात आलं आहे. जे पदाधिकारी अधिकाधिक लोकांना सदस्य करतील त्यांना बक्षिस दिले जाईल, असं मुथ्यालकन यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com