Congress Politics : दिल्लीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची मॅरेथॉन बैठक; उमेदवारांची यादी होणार फायनल

Election Lok Sabha 2024 : छाननी समितीच्या बैठकीनंतर बुधवारी काँग्रेस निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीतच काँग्रेस आपल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करणार आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राज्यातील महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 10 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. आघाडीतील प्रमुख नेत्यांची गुरुवारी (ता. 21) सकाळी बैठक होणार असून त्यावेळी जागावाटपाची घोषणा करणार होणार असल्याचे बोलले जात आहे. तत्पुर्वी काँग्रेस छाननी समितीची बैठक झाली. यात काँग्रेसने (Congress) आपल्या उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली. Congress Politics

डॉ. मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षेतखाली काँग्रेस छाननी समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत आघाडीत वाट्याला आलेल्या जागांवर कुणाला उमेदवारी द्यायची, यावर चर्चा झालेली आहे.

Congress
IAS Transfer : मुंबई महापालिका आयुक्त चहल यांच्यानंतर अतिरिक्त आयुक्त भिडेंचीही बदली

बैठकीत कोल्हापूरसाठी श्रीमंत शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati ) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. तर नागपूरमधून विकास ठाकरे यांचे नाव आघाडीवर होते. गडचिरोलीसाठी डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नावाची चर्चा आहे. रामटेक आणि चंद्रपूरसाठी काँग्रेसमध्ये चुरस असल्याचे दिसून येते आहे.

चंद्रपूरच्या जागेसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), सुभाष धोटे आणि प्रतिभा धानोरकर आग्रही असून त्यांच्या नावांची चर्चा आहेत. तर रामटेकमधून नितीन राऊत, रश्मी बर्वे आणि राजू पारवे यांची नावे चर्चेत आहेत. असे असले तरी या छाननी समितीच्या बैठकीनंतर बुधवारी काँग्रेस निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीतच काँग्रेस आपल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करणार आहे. त्यामुळे उद्याच्या काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Congress
Lok Sabha Election 2024 : 'संभाजीनगरवर पुन्हा भगवा फडकू दे..' ; उद्धव ठाकरेंचे भद्रा मारोतीला साकडे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com